वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाला मिळाला पुनर्जन्म; लिफ्टमध्ये अडकल्यावर भिंत फोडून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 06:27 PM2021-08-13T18:27:56+5:302021-08-13T18:28:02+5:30

लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सातव्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली.

The boy who dropped the newspaper got reborn; When he got stuck in the elevator, he broke the wall and saved his life | वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाला मिळाला पुनर्जन्म; लिफ्टमध्ये अडकल्यावर भिंत फोडून वाचवला जीव

वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाला मिळाला पुनर्जन्म; लिफ्टमध्ये अडकल्यावर भिंत फोडून वाचवला जीव

Next
ठळक मुद्देमुलाने समयसुचकता दाखवल्याने वाईट प्रसंग टळला

पिंपरी : पिंपरीच्या साईनगर सोसायटीत लिफ्टमध्ये अडकलेल्या वर्तमानपत्र वितरक मुलाची भिंत फोडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुमित आळसे (वय १७ वर्षे) असे या मुलाचे नाव आहे. 

साई नगरी मध्ये शुक्रवारी सकाळी सुमित वर्तमानपत्र वितरण करत होता. दोन बिल्डिंगमध्ये वर्तमानपत्र वितरण केल्यानंतर तिसऱ्या बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये प्रवेश करून सातव्या मजल्यापर्यंत पोहचला. मात्र, लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सातव्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली. अचानक आलेल्या संकटाने तो थोडासा गोंधळला. परंतु, प्रसंगाधान राखत त्याने लिफ्टमधील अलार्म बटन दाबले व वर्तमानपत्र विक्रेते हेमंत तांबे यांना काॅल केला. तांबे यांनी तातडीने सोसायटीचे चेअरमन निलेश गिते यांना फोन केला. गिते यांनी  सुरक्षारक्षक व लिफ्टच्या देखभाल करणा-या कंपनीला फोन करून अभियंत्याला बोलवले. अडकलेल्या सुमितला बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न करून झाले. मात्र, ते असफल ठरू लागले. शेवटी ब्रेकरने भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि सुमितला सुखरूप बाहेर काढले. 

मला पुनर्जन्मचं मिळाला 

मी वर्तमानपत्र टाकण्यासाठी त्या लिफ्टमधे शिरलो. लिफ्ट वर जात असतांना थोडासा धक्का बसला आणि लिफ्ट एकदम वर जाऊन थांबली. लिफ्टची बटणं दाबून पाहिली. मात्र, लिफ्ट जागची हलत नव्हती. धोक्याचा इशारा असणारे बटण दाबले व तांबे सरांनाही फोन करून कळवले. सगळे आले. थोडा धीर आला. लिफ्टच्या बाहेरून सगळ्यांचे प्रयत्न चालू होते. सग‌ळे प्रयत्न निष्कामी ठरत होते. त्यामुळे माझा धीर खचत चालला होता. एका रहिवाश्याने चहा आणि पाणी एका प्लॅस्टिकच्या पिशवीतून एका फटीतून आत टाकले. बाहेर पडण्याच्या आशा संपत चालल्या होत्या. भिंत फोडून मला बाहेर काढण्यात आले. या सर्वांनी मला पुनर्जन्मचं दिल्याच्या भावना सुमित आळसे यांने लोकमतकडे व्यक्त केल्या. 

दररोजच्या प्रमाणे सुमित वर्तमानपत्र टाकण्यासाठी साईनगरी सोसायटीत गेला होता. त्याचा फोन आल्यानंतर मी तिथे तातडीने पोहचलो. सोसायटीच्या व्यवस्थापनाला कळविले. सर्व मुलांना संकटाच्या काळात प्रसंगावधनाचे प्रशिक्षण दिले असल्याने सुमित घाबरला नाही. त्याने समयसुचकता दाखवल्याने वाईट प्रसंग टळला. असे वर्तमानपत्र विक्रेते हेमंत तांबे यांनी सांगितले. 

सोसायटीचे सुरक्षारक्षक तसेच विजय सोनवणे, निलेश पऱ्हाड, पंकज खटावकर हे पदाधिकारी आम्ही सर्वजण जसे जमेल तसे प्रयत्न करत होते. सोसायटीच्या पदाधिका-यांनी लिफ्टच्या मेंटन्सन करणाऱ्या अधिका-यांनाही बोलवले. आम्ही सर्व पातळ्यांवर प्रयत्न करत होते. मात्र, असफल ठरत होतो. शेवटी सर्वमताने भिंत फोडण्याच्या निर्णय घेतला. यानंतर असे प्रसंग घडू नयेत. म्हणून आम्ही टेरेसवर सुखरूप बाहेर पडता येईल अशी छोटीशी खिडकी बसवणार आहोत. 
                                                                              -निलेश गिते, चेअरमन, साईनगरी सोसायटी

Web Title: The boy who dropped the newspaper got reborn; When he got stuck in the elevator, he broke the wall and saved his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.