पिंपरी महापालिकेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स सभांना ब्रेक,स्थायीसह विविध समितीच्या सभा पूर्वीप्रमाणेच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 04:59 PM2020-12-22T16:59:14+5:302020-12-22T16:59:23+5:30

सर्वसाधारण सभेबाबत गोंधळ सुरूच

Break up video conference meetings, various committee meetings with standing as before | पिंपरी महापालिकेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स सभांना ब्रेक,स्थायीसह विविध समितीच्या सभा पूर्वीप्रमाणेच

पिंपरी महापालिकेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स सभांना ब्रेक,स्थायीसह विविध समितीच्या सभा पूर्वीप्रमाणेच

Next

पिंपरी : कोरोनामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरु असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध समितीच्या सभा नियमितपणे घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेबाबत कोणतेही शासनादेश न आल्याने सर्वसाधारण सभांचे काय होणार असा प्रश्न आहे.

मेट्रो सिटींमध्ये कोरोनाचा आलेख वाढत असल्याने महापालिकांच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या होत्या. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून या सभा होत होत्या. डिसेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नियमित सभा घेण्यास या कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागल्याने राज्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी नवीन आदेश दिला आहे. त्यात नियमितपणे स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सभा नियमितपणे घेण्यास मान्यता दिली आहे.
..........
विविध समिती सभेसाठी नियम
ृ१)  आरोग्य विषयक निकष, कोवीड-१९ संदभार्तील विहीत कार्यपध्दती पालन करणे गरजेचे आहे.
२) बैठकांमध्ये मास्कचा वापर, योग्य शारिरीक अंतर ठेवणे, हातांची स्वच्छता, सर्दी व खोकताना घ्यावयाची काळजी घेणे आवश्यक आहे.
३) बैठकीसाठी पुरेशी मोकळी हवेशीर जागा, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
४) तसेच बैठकीच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावर बैठक व्यवस्था करुन सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
....................
स्थायी समितीसह विविध विषय समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेतली जात होती. या सभा पूर्वीप्रमाणे घेण्यास राज्य शासनाने सूचविले आहे. त्यानुसार नियमांचे पालन करून सभा घेण्यात येईल.
-उल्हास जगताप, नगरसचिव.
...................................
सर्वसाधारण सभांबाबत अनिश्चितता
शासनाने दिलेल्या सभांविषयीच्या नवीन आदेशात सर्वसाधारण सभेविषयी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. सध्या ही सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाते. पुढील सभा २० जानेवारीला आहे. विशेष सभेचे नियोजन महापालिका करीत आहे. त्यामुळे सभेचे काय होणार? याबाबत अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Break up video conference meetings, various committee meetings with standing as before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.