पुनावळेत खोदकाम करताना सापडला ब्रिटिशकालीन बाॅम्ब 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 07:25 PM2020-12-19T19:25:45+5:302020-12-19T19:27:39+5:30

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनावळे येथे गृहप्रकल्पाचे कामकाज सुरू आहे...

British-era bomb found while excavating in Punawale | पुनावळेत खोदकाम करताना सापडला ब्रिटिशकालीन बाॅम्ब 

पुनावळेत खोदकाम करताना सापडला ब्रिटिशकालीन बाॅम्ब 

Next

पिंपरी : पुनावळे येथे शनिवारी (दि. १९) खासगी गृहप्रकल्पाच्या बांधकाम साईटवर खोदकाम करताना ब्रिटीशकालीन बाॅम्ब सापडला आहे. पोलिसांनी बाॅम्ब ताब्यात घेतला असून, बाॅम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनावळे येथे गृहप्रकल्पाचे कामकाज सुरू आहे. त्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले जात असताना ब्रिटिशकालीन बाॅम्ब आढळून आला. त्यावेळी जेसीबी चालक व कामगारांनी तेथील सुपरवायजरला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळविण्यात आले. हिंजवडी पोलीस तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाॅम्ब ताब्यात घेतला. तसेच याबाबत पुणे शहर पोलीस दलाच्या बाॅम्ब शोधक व नाशक पथकाला माहिती देण्यात आली आहे. या पथकाकडे बाॅम्ब देण्यात येणार आहे.

Web Title: British-era bomb found while excavating in Punawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.