दारू प्यायला दोनशे रुपये नाही दिले; आरोपींनी दुकानाचे काउंटरच फोडले; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 09:45 PM2021-06-23T21:45:54+5:302021-06-23T21:46:54+5:30

पैसे न दिल्याच्या रागातून दुकानाच्या काउंटरवर कोयत्याने मारून नुकसान केले.

Broke the counter of shop for not paying money for alcohol | दारू प्यायला दोनशे रुपये नाही दिले; आरोपींनी दुकानाचे काउंटरच फोडले; गुन्हा दाखल

दारू प्यायला दोनशे रुपये नाही दिले; आरोपींनी दुकानाचे काउंटरच फोडले; गुन्हा दाखल

Next

पिंपरी : किराणा दुकानात घुसून दारूसाठी पैसे मागितले. ते न दिल्याच्या रागातून दुकानातील काउंटर कोयत्याने फोडून गल्ल्यातील पैसे काढून चोरून घेतले. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे ८ जूनला दुपारी सव्वाएकच्या सुमारास ही घटना घडली.  

सूरज उर्फ सशा वाघमारे, स्वप्न्या उर्फ स्वप्नील माडेकर, राजा माडेकर, साहिल मेहंदळे (सर्व रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन), अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे आनंदनगर झोपडपट्टी येथे माताजी सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. आठ जूनला आरोपी हे लोखंडी कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीच्या दुकानात घुसले. आम्हाला दारू प्यायला दोनशे रुपये दे, असे आरोपी म्हणाले. पैसे न दिल्याच्या रागातून दुकानाच्या काउंटरवर कोयत्याने मारून नुकसान केले. तसेच गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने चोरून घेतले. फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरोपींना विरोध केला असता आरोपींनी हत्याराचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या मदतीला आलेल्या आजूबाजूच्या लोकांना आरोपींनी हत्याराचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली.

Web Title: Broke the counter of shop for not paying money for alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.