होतकरू विद्यार्थ्यांची थांबली पायपीट
By admin | Published: November 17, 2016 03:05 AM2016-11-17T03:05:20+5:302016-11-17T03:05:20+5:30
न्यू इंग्लिश स्कूल, टाकवे या शाळेतील लांबच्या अंतरावरून पायपीट करीत येणाऱ्या गरीब, होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना २५ सायकलींचे वाटप करण्यात आले.
वडगाव मावळ : रोटरी क्लब तळेगाव सिटी, रोटरी क्लब पिंपरी टाउन व संग्राम काकडे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, टाकवे या शाळेतील लांबच्या अंतरावरून पायपीट करीत येणाऱ्या गरीब, होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना २५ सायकलींचे वाटप करण्यात आले.
या मदतीमुळे येथील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्या-जाण्यातील वेळ वाचणार असून त्या वेळेचा उपयोग अभ्यासासाठी करता येणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
रोटरी सिटीच्या मोफत जर्मन भाषा प्रशिक्षण हा उपक्रमातून पाच हजार विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी स्पष्ट केले.
या वेळी तळेगाव सिटीचे दादासाहेब उर्हे, दिलीप पारेख, राजेश गाडे पाटील, बाळासाहेब रिकामे, सुरेश दाभाडे, हरिश्चंद्र गडसिंग, रोटरी पिंपरी टाउनचे अनिल नेवाळे,बाळासाहेब उर्हे, रवींद्र भावे, सारंग माताडे, प्रदीप वाल्हेकर,राम भोसले, सदाशिव काळे आदी उपस्थित होते.
भगवान शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर रोटरी तळेगाव सिटीचे उपाध्यक्ष शशिकांत हळदे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि परिसरातील ग्रामस्थांनी रोटरीच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)