Budget 2019: शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:12 AM2019-02-02T02:12:04+5:302019-02-02T02:12:22+5:30
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करणार, दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र शेती जोडधंदा, खत व हमीभाव यावर काहीच नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी घोषणांचा वर्षाव अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करणार, दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र शेती जोडधंदा, खत व हमीभाव यावर काहीच नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे. कारण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचे यामध्ये सांगितले आहे. मात्र संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा सहाशे रुपये दिले जातात. आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कुटुंबाला दरमहा पाचशे रुपये दिले जाणार. याचा अर्थ ही शेतकऱ्यांची थेट फसवणूक आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामधूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेला हा अर्थसंकल्प आहे.
- हरिश मोरे, कार्याध्यक्ष,
शेतकरी कामगार संघटना
अर्थसंकल्पातील किसान सन्मान निधीचाही शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, पण महागाईचा जमान्यात हेक्टरी सहा हजार म्हणजे तुंटपुंजी मदत आहे ती वाढवायला हवी, पशुधन व मस्त्यव्यवसायासाठी शेतकरी घेत असलेल्या कर्जावर दोन टक्के सवलत शेतकऱ्यांना आधार देण्यासारखी आहे, यामुळे तरूण शेतीकडे वळण्याबरोबर जोड धंदा म्हणून हा व्यवसाय करण्याचा विचार करू शकतात. - सुनिल गरुड, शेतकरी
शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी योजनांची घोषणा केली असली तरी सरकारने शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये देऊ केलेली रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी वर्गाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न केला आहे. देऊ केलेली रक्कम गरजू व्यक्तीपर्यंत पोहचणे म्हत्त्वाचे आहे.
- संतोष आरोटे, शेतकरी
असंघटीत कामागारांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. पेन्शनचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या योजनेमुळे असंघटित कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र संघटित कामगारांचा या वेळीही काहीच विचार केला गेला नाही. कंत्राटी कामगार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यांना पर्मन्ट कसे करता येईल यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एकूणच कामगारांसाठी संमिश्र असा संकल्प आहे. - यशवंत भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी
हा अर्थसंकल्प कामगार वर्गाचे हित जपणारा असून विशेषत: असंघटीत कामगारांना या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळालेला आहे. आता कामगारांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने त्यांचे जीवनमान सुखकर होण्यास मदत होणार आहे.
- संजय चव्हाण, नोकरदार
पेन्शनधारकांसाठी हा अर्थसंकल्प खूप चांगला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बचत होण्यासाठी मदत होईल. त्याचा फायदा नक्कीच सर्व पेन्शनधारकांना होईल.
- गायत्री येवलेकर, नोकरदार
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजातून मिळणाºया चाळीस हजार रुपयांच्या उत्पन्नासाठी टीडीएस भरावा लागणार नाही, ही योजना स्वागतार्ह आहे. ज्येष्ठांचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा अर्थसंकल्प फायद्याचा आहे.
- सूर्यकांत पारखी, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघटना, चिंचवड