घरफोडी, वाहनचोरी करणारे जेरबंद, निगडी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 04:11 AM2018-03-04T04:11:03+5:302018-03-04T04:11:03+5:30

A burglary, a motorcycle carrying a motorcycle, Nigdi police action | घरफोडी, वाहनचोरी करणारे जेरबंद, निगडी पोलिसांची कारवाई

घरफोडी, वाहनचोरी करणारे जेरबंद, निगडी पोलिसांची कारवाई

Next

पिंपरी : घरफोडी, वाहनचोरी करणारया दोन सराईत गुन्हेगारांना आणि दोन अल्पवयीन चोरट्याला निगडी पोलिसांनी जेरबंद केले. तसेच बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाºया दोघांना अटक केली आहे.
निगडी पोलीस टाळगाव चिखली हद्दीत गस्त घालत असताना परसप्पा सिद्धप्पा होसमनी (वय २८, रा. सोनवणे वस्ती, चिखली, मूळगाव कर्नाटक) हा हातात ब्राऊन रंगाची बॅग घेऊन संशयितरित्या फिरत होता. त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. बॅगेची झडती घेतली असता दोन लॅपटॉप, कागदपत्रे मिळाली. त्याला ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता आठ दिवसांपुर्वी मोशीतील, संभाजीनगर मधून हा ऐवज चोरला असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील दुकानात घरफोडी करणारा आरोपी आनंद त्र्यंबक इंदुकाने (वय २२, रा. प्राधिकरण, निगडी) यालाही अटक केली. त्याच्याकडून रहात्या घराजवळ लाईट डिपीच्या खाली दडवून ठेवलेले एक लाख ९२ हजारांची रोकड, कॉर्पोरेशन बँकेचे पास बुक, चेक बुक जप्त करण्यात आले. त्याचबरोबर चिखली येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी दोन अल्पवयीन चोरट्याला त्याब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून १ लाख १४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आले. या आरोपींकडून एकूण सात गुन्हे उघडकीस आले.
तसेच हद्दीत पेट्रोलिंग करत असताना साईनाथनगर निगडी येथे इस्माईल युसूफ शेख (वय ३६) याच्याकडे गावठी कठ्ठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा गावठी कठ्ठा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर म्हेत्रे कॉर्नर येथे देखील एकाकडे गावठी कठ्ठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुभम नितीन काळभोर (वय,१८ रा. भिमशक्तीनगर, स्पाईनरोड, चिंचवड) याला अटक केली. त्याच्याकडून ६० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कामगिरी निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण, कर्मचारी तात्या तापकीर, किशोर पढेर, विलास केकाण, नारायण जाधव, मच्छिंद्र घनवट, आनंद चव्हाण, स्वामीनाथ जाधव, संदीप पाटील, रमेश मावसकर यांच्या पथकाने केली.
वाहनांच्या लागल्या रांगा
पिंपरी : बस चालकाने रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी साईड दिली नाही म्हणून रुग्णवाहिकेच्या चालकाने शिवनेरी बसची किल्ली काढून नेली. हा प्रकार दापोडी येथे मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान घडला. या प्रकारामुळे पुणे-मुंबई लेनवर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने पुणे स्टेशन-दादर ही शिवनेरी बस निघाली होती. दापोडी येथील सीएमई जवळ बस आल्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाने बसची किल्ली काढून घेतली.

Web Title: A burglary, a motorcycle carrying a motorcycle, Nigdi police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा