एकविरा देवीच्या मंदिर परिसरात फटाके फोडणे पडले महागात; मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:40 IST2025-01-02T09:39:55+5:302025-01-02T09:40:42+5:30
कार्ला येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

एकविरा देवीच्या मंदिर परिसरात फटाके फोडणे पडले महागात; मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी
पवनानगर - मावळ तालुक्यातील लोणावळा येथील आई एकविरा देवीच्या मंदिर परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आई एकविरा देवी कार्ला येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.अनेक भाविक कुटुंबासोबत देवीच्या दर्शनासाठी तसेच नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक उपस्थितीत होते.
एकविरा देवीच्या मंदिर परिसरात फटाके फोडणे पडले महागात;मधमाशांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी pic.twitter.com/M9mwoexwS3
— Lokmat (@lokmat) January 2, 2025
गडावर आलेल्या काही भाविकांनी रंगीबेरंगी फटाके फोडल्याने त्यामधील कलर धुरामुळे धुरांचे प्रमाण वाढल्याने गडाच्या परिसरात असलेल्या झाडाच्या फांदीवर असलेल्या मधमाश्यांच्या पोळापर्यत कलर धुरांचे झोत पोहचले त्या धुरामुळे मधमाशा वरील माशा उठल्या व सैरभैर झालं.यामुळे तेथील भाविकांमध्ये एकच पळापळी झाली.अनेकांना त्या मधमाश्यांनी चावा घेतला.त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
यामध्ये अनेक भाविक जखमी झाले आहे. तर काही वेळांनतर मधमाशा शांत झाल्या. भाविकांनी सुटकेचा निष्वास सोडला.चावा घेतलेल्या रुग्णांना लोणावळा व कार्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर जखमींची प्रकृती बरी झाल्याने त्यांना औषधोपचार देऊन घरी सोडून देण्यात आले.