दापोडी-निगडी 'बीआरटीएस' मार्गावर बस धावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 03:23 PM2018-08-24T15:23:56+5:302018-08-24T15:26:05+5:30

गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता.

Bus ran on Dapodi-Nigdi 'BRTS' route | दापोडी-निगडी 'बीआरटीएस' मार्गावर बस धावली 

दापोडी-निगडी 'बीआरटीएस' मार्गावर बस धावली 

googlenewsNext
ठळक मुद्दे बीआरटीएस मार्गावरील बंदी न्यायालयाने उठविल्यानंतर मार्गावर बस सुरुइतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर आठ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी (दि. २४ आॅगस्ट) अखेर पीएमपीएमल बस धावली. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून निगडीतून बीआरटी मार्गावर बससेवा सुरु झाली. तसेच निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलचे देखील उद्घाटन करण्यात आले. 
यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे, सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएलच्या व्यस्थापकीय संचालिका व अध्यक्षा नयना गुंडे, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंबासे, उपअभियंता विजय भोजने,  दिपक पाटील, संजय काशिद, संजय साळी, बाळासाहेब शेटे उपसथित होते.
गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता. सन २०१३ मध्ये बीआरटीएस मार्गावर सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या नसल्याचे कारण देत अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने सुरक्षिततेबाबत उपाययोजना करुन याचिकाकर्त्यांसोबत मार्गावर तीन वेळा बसची चाचणी घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने बीआरटीएस बस सुरु करण्यास नुकताच हिरवा कंदील दर्शविला होता. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या  बीआरटीएस मार्गावरील बंदी न्यायालयाने उठविल्यानंतर मार्गावर बस सुरु केली आहे. दोन महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करुन कायमस्वरुपी बस चालू करण्यात येणार आहे.
या मार्गावरुन २७३ बस धावणार आहेत. एका दिवसाला २२०० ते २३०० फे-या होतील. एका मिनिटाला एक बस धावणार आहे. पुणे स्टेशन, मनपा भवन, हडपसर, शेवाळवाडी, वाघोली, कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोथरुड डेपो, वारजे माळवाडी या मार्गावरील बस धावणार आहेत. पीएमपीच्या ११३ गाड्या, तर भाडेतत्त्वावरील १३९गाड्या या मार्गावर नव्याने आणल्या असून, अन्य बीआरटी मार्गावरील २१ गाड्या अशा एकूण २७३ गाड्या या मार्गावर धावतील. सध्या या मार्गावरून धावणा-या काही जुन्या गाड्या अन्य मार्गांवर पाठविल्या जातील. 
बीआरटीएस मागार्तून केवळ बीआरटीच्या बस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला परवानी देण्यात आली असून इतर वाहनांना परवानगी नाही. इतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार आहे. पालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिली आहे.

Web Title: Bus ran on Dapodi-Nigdi 'BRTS' route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.