बावधन येथील बसथांबा, मोटारीची तोडफोड करणाऱ्यांना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 05:08 PM2018-08-10T17:08:47+5:302018-08-10T17:13:06+5:30

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदवेळी बावधन येथे जमावाने गाड्या आणि बस थांब्याची तोडफोड केली होती

Bus stop and motorbike breakable persons arrested | बावधन येथील बसथांबा, मोटारीची तोडफोड करणाऱ्यांना अटक  

बावधन येथील बसथांबा, मोटारीची तोडफोड करणाऱ्यांना अटक  

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमोर्चा काढून आंदोलन केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोनशे ते तीनशे जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : बावधान येथे बसथांब्याचे नुकसान तसेच सरकारी मोटारीची तोडफोड करण्यासह पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी हिंजवडीपोलिसांनी आठ जणांना अटक केली असून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. संजय किसन दगडे (वय ४९, रा. बावधान बुद्रुक), दिनेश वामन घोरपडे (वय ३९, रा. बावधान), सचिन भिमराव ठेंगी ( वय ३१, रा. हिंजवडी), संजय गणेश पोळेकर (वय ३१, रा. रामनगर, वारजे), हरिष जगदीश राजपूत (वय ३८, रा. पाषाण), सागर सोमनाथ गुरसाळे (वय २३, रा. वारजे), सुभाष गणेश पोळेकर (वय २७, रा. रामनगर, वारजे), गणेश लक्ष्मण मुळे (वय २४, रा. कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासह बारा दुचाकीस्वार तसेच इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनात जमावबंदीचे आदेश होते. तरीही या आदेशाचा भंग करुन बावधान येथे मुंबई-बेंगलोर बायपास हायवेवर तसेच मराठा मंदीरासमोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी तीन वाजता बेकायदेशीररित्या जमाव जमविण्यात आला होता. यावेळी बावधान येथे रस्त्यालगत असलेला बसथांबा तसेच त्याच्याशेजारील पत्र्याचे शेड जमावाकडून तोडण्यात आले. यासह सरकारी मोटारीची काच फोडली. तसेच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
---------------------------
यासह बालेवाडी येथील राधा चौक ते छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर पोलीस परवानगी न घेता मोर्चा काढून आंदोलन केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोनशे ते तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Bus stop and motorbike breakable persons arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.