प्रेरणापथ : आठ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या दाम्पत्याने सुरू केला व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:10 AM2018-12-28T01:10:08+5:302018-12-28T01:14:27+5:30

आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात उभे राहू पाहणाऱ्या सोनवणे दाम्पत्याला व्यावसायिक बनविण्याचे कार्य महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांच्या ‘प्रेरणापथ’ या उपक्रमातून सुरूझाले.

The business started by a couple who eight years in jail | प्रेरणापथ : आठ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या दाम्पत्याने सुरू केला व्यवसाय

प्रेरणापथ : आठ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या दाम्पत्याने सुरू केला व्यवसाय

Next

चिंचवड : आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात उभे राहू पाहणाऱ्या सोनवणे दाम्पत्याला व्यावसायिक बनविण्याचे कार्य महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांच्या ‘प्रेरणापथ’ या उपक्रमातून सुरूझाले. या कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून नव्या व्यवसायाची सुरुवात चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात प्रेरणापथ फूटवेअरच्या माध्यमातून करण्यात आली.
गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या अनेकांना तुरुंगवास भोगून आल्यानंतर ‘पुढे काय करायचे?’ ही समस्या सतावत असते. मात्र अशा गुन्हेगारांचा कलंक पुसण्यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत आहे.
प्रकाश सखाराम सोनवणे व त्यांची पत्नी रंजना सोनवणे या दाम्पत्याला कौटुंबिक वादामुळे आठ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. मात्र आता पुढे काय करणार, हा मोठा प्रश्न त्यांना सतावत होता. हे कुटुंब सध्या आकुर्डीतील वृद्धाश्रमात वास्तव्यास आहे. या दाम्पत्याला छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुरुवारी फूटवेअरचे दुकान सुरू करून दिले. या दुकानाचे उद्घाटन मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते झाले. उपमहापौर सचिन चिंचवडे, पक्षनेते एकनाथ पवार, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, शिल्पकार विवेक खटावकर, इकबाल दरबार, प्रताप परदेशी, नगरसेवक शीतल शिंदे, नामदेव ढाके, अनुराधा गोरखे, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, मिलिंद भोई, महेंद्र आगरवाल, कुमार रेणुसे, सागर पवार, शेखर देडगावकर, नितीन लचके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी भारती निंबा भारंबे व नोव्हेल इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे यांनी विशेष सहकार्य केले.

Web Title: The business started by a couple who eight years in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.