Pimpri Chinchwad | पत्नी, मेव्हण्याकडून व्यावसायिकाला लाकडी दांडक्याने मारहाण; पिंपळे सौदागरमधील घटना
By नारायण बडगुजर | Updated: March 23, 2023 16:45 IST2023-03-23T16:45:10+5:302023-03-23T16:45:56+5:30
याप्रकरणी ५० वर्षीय व्यावसायिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद...

Pimpri Chinchwad | पत्नी, मेव्हण्याकडून व्यावसायिकाला लाकडी दांडक्याने मारहाण; पिंपळे सौदागरमधील घटना
पिंपरी : दुकानाची जागा बळकावण्यासाठी पत्नीने आणि मेव्हण्याने व्यावसायिकाला मारहाण केली. यात व्यावसायिक जखमी झाला. पिंपळे सौदागर, जगताप डेअरी चौक, रहाटणी येथे बुधवारी (दि. २२) सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी ५० वर्षीय व्यावसायिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार व्यावसायिकाची पत्नी आणि मेव्हणा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी आणि मेव्हणा या दोघांनी फिर्यादीच्या दुकानाची जागा बळकावण्यासाठी फिर्यादीला दुकानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीने नकार दिला.
त्यामुळे मेव्हण्याने फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पत्नीने देखील प्लॅस्टिकच्या पाईपने फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर मेव्हण्याने कोणत्यातरी कठीण वस्तूने फिर्यादीच्या तोंडावर मारून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.