रूग्णालयांंसाठी होणार औषध खरेदी
By admin | Published: July 17, 2017 04:09 AM2017-07-17T04:09:46+5:302017-07-17T04:09:46+5:30
महापालिकेच्या दवाखाने, रुग्णालयांंसाठी आवश्यक औषधे, साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिका अर्थसंकल्पात
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेच्या दवाखाने, रुग्णालयांंसाठी आवश्यक औषधे, साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिका अर्थसंकल्पात औषधे खरेदीसाठी ११ कोटींची तरतूद असून, पुरवठाधारकास पहिल्या टप्प्यात १ कोटी ८६ लाख रुपयांची औषधे पुरवठा करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या दवाखाने, रुग्णालयांंसाठी आवश्यक औषधे, साहित्य खरेदी करण्यात येतात. या औषध खरेदीसाठी ई-निविदा पद्धतीने दोन वर्षांकरिता चांगल्या व गुणात्मक कंपन्या प्राप्त व्हाव्यात यासाठी नावनोंदणी व कंपनींची निवड करण्यासाठी औषधे, साहित्याची यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये ८०९ अॅलोपॅथिक औषधे, ४४९ सर्जिकल साहित्य, १९८ आयुर्वेदिक औषधे, २११ दंतरोग साहित्य अशी विविध प्रकारची एक हजार ६६७ औषधे, साहित्याचा निविदेमध्ये समावेश होता. त्यानुसार दोन वर्षांकरिता औषधे व साहित्य खरेदीसाठी पाच प्रकारच्या निविदा मागविल्या. या निविदा नोटिशीमध्ये नमूद केल्यानुसार, कंपनीच्या मूळ अधिकृत विक्रत्यांची पत्रे निविदाधारकांनी भांडारात जमा केली होती. त्यांपैकी होमिओपॅथिक औषधांच्या एकाही अधिकृत विक्रेत्याने पत्र सादर केले नाही. मिळालेल्या पत्रांवरून कंपन्यांची निवड ‘औषधे निविदा समिती’मार्फत केली आहे. त्यानुसार, प्राप्त लघुतम दरानुसार खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता महापालिकेने अर्थसंकल्पात औषधे, साहित्य खरेदीसाठी ११ कोटींची तरतूद केली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात दवाखाने, रुग्णालयांकडून त्यांनी केलेल्या वार्षिक मागणीनुसार औषध खरेदी करणे आवश्यक आहे.