चाळकवाडी टोलनाका ग्रामस्थांनी केला बंद, जिल्हाधिका-यांना निवेदन, बेकायदा टोलवसुलीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:44 PM2017-09-18T23:44:06+5:302017-09-18T23:47:34+5:30

चाळकवाडी येथील टोलनाक्यावर रविवारी (दि. १७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विविध मागण्यांसाठी आमदार शरद सोनवणे व चाळकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Calakavadi off the Toll Villagers, the Collector in a statement, protest illegal tolavasulila | चाळकवाडी टोलनाका ग्रामस्थांनी केला बंद, जिल्हाधिका-यांना निवेदन, बेकायदा टोलवसुलीला विरोध

चाळकवाडी टोलनाका ग्रामस्थांनी केला बंद, जिल्हाधिका-यांना निवेदन, बेकायदा टोलवसुलीला विरोध

Next

पिंपळवंडी : चाळकवाडी येथील टोलनाक्यावर रविवारी (दि. १७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विविध मागण्यांसाठी आमदार शरद सोनवणे व चाळकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत टोलनाका बंद ठेवण्याची मागणी करत टोलनाक्याचे कामकाज बंद करण्यात आले. याबाबत विविध मागण्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिका-यांना पाठविण्यात आले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी टोलनाका २१ फेब्रुवारी २०१७ ला सुरू करण्यात आल्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महामार्गांचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, नियमानुसार टोलनाका सुरू करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी नागरिकांनी हा टोलनाका सुरू करण्यास काही नागरिकांनी विरोध केला होता. पुणे-नाशिक महामार्गाचे आळेखिंड ते राजगुरुनगर या दरम्यान असलेली बाह्यवळणे व पुलाची कामे अद्यापही अर्धवट स्थितीत आहेत, तर अनेक शेतकºयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. ज्या ठिकाणी जुन्या महामार्गाचा वापर होत आहे, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत हे खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात एखाद्याचा बळी जाऊ शकतो, असे असतानाही टोल प्रशासनाने टोलनाका सुरू करून टोलवसुली सुरू केली होती. येथील शेतकºयांनी हा टोलनाका करण्यास सुरुवातीपासूनच विरोध केला होता. परंतु येथील स्थानिक शेतक-यांचा विरोध डावलून हा टोलनाका सुरू करण्यात आला. हा टोलनाका सुरू झाल्यानंतर जुन्नर तालुक्यातील नागरिकांना टोलमधून वगळण्यात आले होते. मात्र, स्थानिक नागरिकांकडूनही टोलवसुली सुरू करण्यात आल्यामुळे स्थानिक वाहनचालकांनीही यास विरोध केला होता. सहा महिने होऊनही आश्वासन पाळले गेले नसल्यामुळे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी आंदोलन करून टोलनाका बंद केला.

बाधित शेतक-यांचे नुकसानभरपाईचे पैसे न्यायालयात गेले असल्यामुळे अजूनही त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसेच, महामार्गाची अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून, ही कामे पूर्ण झाल्याशिवाय व बाधित शेतक-यांना नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय टोलनाका सुरू करून देणार नाही.
- शरद सोनवणे, आमदार, जुन्नर तालुका
टोलनाका प्रशासनाने चाळकवाडी ग्रामस्थ व बाधित शेतक-यांचे प्रश्न तीन महिन्यांमध्ये सोडविण्याचे आश्वासन टोलनाका प्रशासनाने दिले होते. मात्र, सहा महिने होऊनही हे आश्वासन पाळले गेले नाही,, त्यामुळे आम्हा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागत आहे.
- प्रदीप चाळक, बाधित शेतकरी
टोलनाक्याचे काम करत असताना महामार्गाच्या कडेला गटारे न काढल्यामुळे पावसाचे पाणी घरात जात आहे, तर टोलनाक्याजवळ साचणारे पावसाचे पाणी शेतात काढून दिल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे आमच्या अडचणी दूर झाल्यानंतरच टोलनाका सुरू केला जाईल.
- अर्चना संजय चाळक, बाधित शेतकरी
आमची घरे महामार्गालगत असल्याने वाहनांच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे त्रास होत आहे, तसेच माझ्या हॉटेलची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसल्यामुळे दुसरा व्यवसाय सुरू करू शकत नाही, त्यामुळे आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे, जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करून देणार नाही.
- योगेश चाळक, बाधित शेतकरी

Web Title: Calakavadi off the Toll Villagers, the Collector in a statement, protest illegal tolavasulila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.