विमानवारीची तिकिटे केली रद्द, महापालिकेला लाखोंचा भूर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 06:21 AM2017-10-29T06:21:52+5:302017-10-29T06:22:02+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि अधिका-यांची अहमदाबाद रॅली काढली आहे. ऐनवेळी सुमारे चाळीस जणांची तिकिटे रद्द केल्याने महापालिकेस लाखोंचा फटका बसला आहे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि अधिका-यांची अहमदाबाद रॅली काढली आहे. ऐनवेळी सुमारे चाळीस जणांची तिकिटे रद्द केल्याने महापालिकेस लाखोंचा फटका बसला आहे. नियोजनाअभावी, हा फटका बसल्याने जागरूक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
पिंपरी महापालिकेत नगरसेवक, पदाधिकाºयांचे दौरे, सहलीची परंपरा कायम आहे. हीच परंपरा भारतीय जनता पक्षाने कायम ठेवली आहे. अभ्यास दौºयांच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी सुरूच आहे. महापालिकेच्या खर्चाऐवजी ठेकेदारांच्या खर्चाने अभ्यास दौरे करण्याची युक्ती लढविली आहे. महापौर नितीन काळजे हे नोव्हेंबर महिन्यात स्पेनच्या दौºयावर रवाना होणार आहेत. त्या पाठोपाठ महिला व बाल कल्याण समितीच्या नऊ नगरसेवकांनीही अभ्यास दौºयाचा हट्ट पूर्ण केला. केरळ दौºयासाठी येणाºया खर्चास स्थायी समितीने मंजुरीही दिली. दरम्यान, महिला व बाल कल्याण समितीचे सात सदस्यांनी सिंगापूर दौरा केला आहे. त्यानंतर अहमदाबादसाठी बीआरटी दौºयात महापालिकेचे सदस्य आणि अधिकारी असे एकूण १५० जण या दौºयात सहभागी होणार होते. तीन टप्प्यातील दौरा दोन टप्प्यात केला आहे. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दोनच टप्प्यात दौरा होणार आहे. तर स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे यांनी दौºयात सहभागी होण्याविषयी प्रशासनास नकार कळविला आहे.