मतदारसंघाचे उमेदवारांना कुंपण

By admin | Published: October 4, 2014 11:52 PM2014-10-04T23:52:00+5:302014-10-04T23:52:00+5:30

गेल्या 5 वर्षापासून सत्तेत बसलेल्या आणि सत्तेबाहेर असलेल्या शहरातील सर्वपक्षीय आमदारांकडून तसेच राजकीय पक्षांकडून शहराच्या समस्यांसाठी गळा काढला जात होता

Candidates for the constituency fence | मतदारसंघाचे उमेदवारांना कुंपण

मतदारसंघाचे उमेदवारांना कुंपण

Next
>पुणो : गेल्या 5 वर्षापासून सत्तेत बसलेल्या आणि सत्तेबाहेर असलेल्या शहरातील सर्वपक्षीय आमदारांकडून तसेच राजकीय पक्षांकडून शहराच्या समस्यांसाठी गळा काढला जात होता. मात्र, प्रत्यक्षात विधानसभा निवडणूकींची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर या आमदारांना आणि राजकीय पक्षांनाही शहराच्या प्रश्नांचा विसर पडला असल्याचे चित्र आहे. शहरातील विद्यमान आमदारांनी आपण आपल्या मतदारसंघासाठी काय केले याचे अहवाल तयार केले आहेत़ त्यात शहराच्या संपूर्ण विकासाऐवजी मतदारसंघालाच महत्व दिले आह़े अनेक उमेदवारांनी मतदारसंघाचा योजना तयार केल्या आहेत़ पण त्यात संपूर्ण शहराचा विचार करताना दिसून येत नाही़ 
निवडणूकीसाठी अवघ्या 1क् दिवसांचा कालावधी उरला असतानाही, अद्याप एकाही नेत्याने अथवा आमदाराने शहराच्या प्रश्नांबाबत भाष्य केलेले नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने शहरासाठीचा आपला अजेंडाही अद्याप जनतेपुढे मांडलेला नाही. या उमेदवारांना शहरासाठी वाटत असलेली चिंता पुतना मावशीचे प्रेम होते की काय असा सवाल सर्वसामन्यांमधून उपस्थित केला जात आहे. 
शहरात  झोपडपटटी पुनर्वसनासाठीची एसआरए नियमावली, मेट्रो, जेएनएनयुआरएम योजनेचे रखडलेले अनुदान, बीआरटी, पीएमआरडीए, म्हाडाची नियमावली, महापालिकेची राज्यशासनाकडे थकीत असलेली देणी, रिंग रोड, शहराचा विकास आराखडा असे एक ना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणूका डोळ्यासमोर दिसू लागताच या प्रश्नांच्या नावाखाली सर्वच राजकीय पक्षाच्या विद्यमान आमदारांनी आंदोलने, मोर्चे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बैठका घेऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकर घेत असल्याचे भासवून दिले. मात्र, प्रत्यक्षात चर्चेव्यक्तिरिक्त कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. तर आता या विद्यमान व त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या कोणत्याही उमेदवारांनी आपल्या विकास कामांच्या अजेंडयात या प्रश्नांचा समावेश केला नाही. शहराच्या प्रश्नांवर घसा काढणा-या या उमेदवारांचे अजेंडे केवळ आपल्या मतदारसंघा पुरतेच मर्यादीत राहिले असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)
 
च्प्रत्येक उमेदवारास आपल्या मतदारसंघात लक्ष घालणो महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्या पक्षाचे उमेदवार संपूर्ण शहरासाठी काय करतील याची दिशा व अजेंडा मांडणो ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असणार आहे. 
च्अद्याप एकाही पक्षाने उमेदवाराच्या मतदारसंघापलीकडे जाऊन शहरासाठीची भूमिका  स्पष्ट केलेली नाही, अथवा त्यांचे जाहीरनामेही तयार नाहीत. सर्वच पक्षांचा आपला शहरासाठी जाहीरनामा असणार नाही. तर प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र जाहीरनामा असेल अस स्पष्ट केलेले आहे. 
च्शहरातील प्रश्न हे मतदारसंघापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण शहराचे असतात़ त्यावर एकत्रित काही करणो पक्षांनी टाळले आह़े  

Web Title: Candidates for the constituency fence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.