काळेवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मोटार जळून खाक, दोन तरुण किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:26 IST2019-02-22T13:17:49+5:302019-02-22T13:26:23+5:30
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक मोटार जळून खाक झाली

काळेवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मोटार जळून खाक, दोन तरुण किरकोळ जखमी
पिंपरी : काळेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक मोटार जळून खाक झाली. या आगीत दोन तरुण किरकोळ भाजले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. २२) पहाटे साडेपाचच्या सुमारास काळेवाडीतील ज्योतीबानगर येथे घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,गणेश वायभट (वय २१) आणि योगेश वायभट (वय २३) अशी जखमीची नावे आहेत. काळेवाडी येथील ज्योतीबानगरमध्ये (एमएच.१४/बीए.६४६४) ही मोटार शॉर्टसर्किटमुळे जळाली. आग लागल्याची माहिती पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रास मिळाली होती. त्यानुसार, संत तुकारामनगर आणि चिखली येथून प्रत्येकी एक बंब अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत गणेश आणि योगेश हे दोन तरुण किरकोळ भाजले असून त्यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोटार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.