करिअर निवडीचे सोल्यूशन
By admin | Published: June 2, 2017 02:23 AM2017-06-02T02:23:24+5:302017-06-02T02:23:24+5:30
‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१७ ’उपक्रम शनिवार, रविवार ह्या दोन दिवशी आयोजित करण्यात आला आहे. हे प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१७ ’उपक्रम शनिवार, रविवार ह्या दोन दिवशी आयोजित करण्यात आला आहे. हे प्रदर्शन विद्यार्थी पालकांना जसे मार्गदर्शक आहे. तसेच विविध शिक्षण संस्थांसाठीही महत्त्वपूर्ण ठरणारे आहे,’ असे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.
पारंपरिक आणि चोकोरीबद्ध शिक्षणाला आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन विद्यार्थी लवकरच स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील, असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फार्मसी अर्थात औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमानंतर कोणत्या संधी आहेत. हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी लोकमतचा अॅस्पायर एज्युकेशन फेअर उपक्रम दुवा ठरणारा आहे. केवळ फार्मसी अभ्यासक़्रमाचे महत्त्वच नाही, तर या अभ्याक्रमाला प्रवेश कसा मिळविता येईल. कागदपत्र कोणती आवश्यक आहेत. शिष्यवृत्ती, फ्री शीप याविषयीची माहिती देण्यासाठी लोकमतचा उपक्रम एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
- डॉ. ब्रिजेंद्र जैन, प्राचार्य,
इंद्रायणी इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी
पारंपरिक अभ्यासक्रमाशिवाय वेगळे काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची ज्यांची इच्छा आहे. त्यांच्यासाठी टाइम्स अॅण्ड ट्रेण्ड अॅकॅडमीत विविध व्यवसायाभिमुख कोर्सेस उपलब्ध आहेत. फॅशन डिझायनिंग, इंटेरिअर डिझायनर, अॅनिमेशन, अकौंट अॅण्ड फायनान्स, इव्हेंट मॅनेजमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट अशा स्वरूपाचे रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम या संस्थेत शिकविले जातात. या अभ्यासक्रमांबाबत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा लोकमतचा हा उपक्रम आहे.
- निकिता आगरवाल, संचालक, टाइम्स अॅण्ड टे्रण्ड अॅकॅडमी
लोकमतने आयोजित केलेल्या अॅस्पायर एज्युकेशन फेअर सारखी प्रदर्शने विविध शिक्षण संस्थांना उपयुक्त ठरत आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचे माध्यम असा हा लोकमतचा उपक्रम आहे. कोणता अभ्यासक्रम निवडावा, त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करावी. याची इंत्यंभूत माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना एकाच छताखाली मिळते.
- संतोष रासकर,
संचालक, सृजन कॉलेज आॅफ डिझायनिंग
विविध शिक्षण संस्थांना एका छताखाली आणून विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे अनेक पर्याय निवडण्याची संधी देणारे लोकमतचे अॅस्पायर एज्युकेशन फेअरचे दालन सर्वांसाठी पर्वणी आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या मनात कोणते क्षेत्र निवडायचे याविषयी संभ्रम असतो. तो संभ्रम दूर करण्यासाठी लोकमतचे अॅस्पायर एज्युकेशन फेअर अत्यंत मोलाचे ठरते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याच्या वळणावर त्याला योग्य प्रकारचे मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे असते. ते मार्गदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून मिळते.
- इरफान शेख, कार्यकारी संचालक,
युनिर्व्हसल कोचिंग