फटाके वाजवताना कारने उडवले; साॅफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू, दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर

By नारायण बडगुजर | Published: November 4, 2024 05:23 PM2024-11-04T17:23:12+5:302024-11-04T17:23:30+5:30

साॅफ्टवेअर इंजिनिअर आपल्या पत्नी आणि लहान मुलासह दिवाळी साजरी करत असताना एका तरुणाने भरधाव कार चालवून उडवले

Cars blew up with fireworks Unfortunate death of software engineer of grief on family in diwali | फटाके वाजवताना कारने उडवले; साॅफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू, दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर

फटाके वाजवताना कारने उडवले; साॅफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू, दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर

पिंपरी : दिवाळीच्या दिवशी फटाके वाजवत असलेल्या साॅफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव कारने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. अपघतानंतर चालक घटनास्थळी न थांबता कार दामटत पळून गेला. रावेत येथे भोंडवे बागकडून औंध रावेत बीआरटी रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर सिलेस्टाइल सिटी सोसायटीच्या समोर असलेल्या फॅलेसिटी सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर शुक्रवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. ऐन दिवाळीत रावेत येथील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

सोहम जयेशकुमार पटेल (३८), असे मृत्यू झालेल्या साॅफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे. त्यांची पत्नी वैदेही सोहम पटेल (३८, रा. फॅलेसिटी सोसायटी, सिलेस्टाइल सिटी सोसायटीच्या समोर रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आदित्य चंद्रकांत भोंडवे (२३, रा. शिंदे वस्ती, रावेत) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शुक्रवारी लक्ष्मी पूजनानंतर दिवाळीचा आनंद व्यक्त करत नागरिकांकडून फटाके वाजवले जात हाेते. त्यावेळी सोहम पटेल हे देखील त्यांच्या राहत्या घराच्या सोसायटीच्या समोर फटाके वाजवत होते. त्यावेळी आदित्य भोंडवे या तरुणाने त्याच्या ताब्यातील भरधाव कारने सोहम यांना धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन सोहम यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आदित्य घटनास्थळी न थांबता कार घेऊन पळून गेला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आदित्य याला ताब्यात घेतले. 

साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेले सोहम हे पत्नी आणि त्यांच्या लहान मुलासह दिवाळी साजरी करत होते. त्यावेळी अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या दिवशी या घटनेने त्यांच्या कुटूुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. लोखंडे तपास करीत आहेत.

Web Title: Cars blew up with fireworks Unfortunate death of software engineer of grief on family in diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.