आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Published: May 3, 2017 02:15 AM2017-05-03T02:15:50+5:302017-05-03T02:15:50+5:30

माहेरहून पैसे आणावेत, यासाठी वारंवार तगादा दिला. तसेच पती व सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केला. त्यामुळे

The case is filed for motivation for suicides | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next

पिंपरी : माहेरहून पैसे आणावेत, यासाठी वारंवार तगादा दिला. तसेच पती व सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केला. त्यामुळे प्रियंका इतेश शेंडगे या विवाहितेने साडीच्या साह्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खडकी येथे घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतेश सुरेश शेंडगे (रा. इराणी चाळ, कांदीवली, मुंबई) या प्रियंकाच्या पतीने अन्य दोन महिला व एक पुरुष यांच्या संगनमताने तिचा छळ केला. २० डिसेंबर २०१५ ला तिचे इतेशबरोबर लग्न झाले. तेव्हापासून अद्यापपर्यंत तिला त्रास दिला जाता होता. ती मुंबईत पतीसोबत राहात होती. कधी खडकीतील सासरच्या मंडळीकडे तिला आणले जात होते. नवीन कार्यालय घेण्यासाठी तिने माहेरहून ४० हजार रुपये आणावेत, असा तगादा लावला होता. १९ एप्रिलला शिवाजी उद्यानासमोर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्या वेळी पती इतेश याने ‘‘आम्ही तुला नांदवणार नाही. तू मरत का नाहीस, दुसरे लग्न करण्याचा मार्ग मोकळा होईल,’’ असे तिला धमकावले होते. या त्रासाला कंटाळून प्रियंकाने आत्महत्या केली. (प्रतिनिधी)

Web Title: The case is filed for motivation for suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.