लग्नाच्या आमिषातून बलात्कार केल्याप्रकरणी लेफ्टनंटवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:51 PM2021-01-08T17:51:22+5:302021-01-08T17:58:54+5:30

आरोपी हा सैन्यदलाच्या बांधकाम विभागात कॅप्टन आहे.

A case has been registered against the lieutenant at Chikhali police station for raping her on the pretext of marriage | लग्नाच्या आमिषातून बलात्कार केल्याप्रकरणी लेफ्टनंटवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लग्नाच्या आमिषातून बलात्कार केल्याप्रकरणी लेफ्टनंटवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देपीडितेची तक्रार : चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : ओळखीतून प्रेमसबंध झाल्यानंतर लग्नाचे आमिष देऊन महिलेवर बळजबरी करून बलात्कार केला. कृष्णानगर चिंचवड, सीएमई दापोडी व खडकी येथे २०१७ ते ८ डिसेंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडला. मिलिट्रीत लेफ्टनंट असलेल्या एका विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ३१ वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ७) फिर्याद दिली. निरजकुमार भारती (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), आरोपीचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सैन्यदलाच्या बांधकाम विभागात कॅप्टन आहे. ओळखीतून फिर्यादी हिच्याशी प्रेमसंबंध करून आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर बळजबरी करून बलात्कार केला. सीएमई दापोडी, खडकी, विमाननगर तसेच हिंजवडी येथील हाॅटेलमध्ये घेऊन जाऊन अत्याचार केले. लग्नाबाबत फिर्यादीने विचारणा केली. आपले सर्व फोटो व आपल्या प्रेमाबाबत तुझ्या आईला भावास सांगेन, अशी धमकी आरोपी देत असे. 

दरम्यान आरोपी हा दुसऱ्या बायकांबरोबर मोबाईलवर चॅंटींग करीत असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादीने त्याला मोबाईलवरून ब्लाॅक केले. त्यामुळे त्याने इ-मेल आयडीवरून भेटण्यास ये, आपण दोघे लग्न करू, असे खोटे सांगितले. तसेच शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादी यांची फसवणूक करून फिर्यादी व तिच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. लग्न न करता फिर्यादीची फसवणूक केली.

Web Title: A case has been registered against the lieutenant at Chikhali police station for raping her on the pretext of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.