YCM रुग्णालयातील कॅशियरवर गुन्हा दाखल, बिलाच्या पावत्या एडीट करून करायचा पैशांचा अपहार

By नारायण बडगुजर | Published: December 13, 2023 07:01 PM2023-12-13T19:01:01+5:302023-12-13T19:01:28+5:30

याप्रकरणी संजीव शांताराम भांगले (५७, रा. पिंपरी गाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली....

Case registered against cashier of YCM hospital, embezzlement of money by editing bill receipts | YCM रुग्णालयातील कॅशियरवर गुन्हा दाखल, बिलाच्या पावत्या एडीट करून करायचा पैशांचा अपहार

YCM रुग्णालयातील कॅशियरवर गुन्हा दाखल, बिलाच्या पावत्या एडीट करून करायचा पैशांचा अपहार

पिंपरी : महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात तरुणाने रुग्णांच्या बिलाच्या पावत्या एडीट करून बिलाच्या रकमेचा अपहार केला. फसवणुकीचा हा प्रकार २ मार्च ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आदित्य अंकुश खंडागळे (२३, रा. जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजीव शांताराम भांगले (५७, रा. पिंपरी गाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा बीव्हीजी कंपनीतर्फे वायसीएम रुग्णालयात कामाला आहे. त्याला कॅश काउंटरच्या कामकाजासाठी व कॅश स्वीकारण्यासाठी नेमण्यात आले. त्याने रुग्णालयातील रक्त पेढी विभाग, एक्सरे विभाग, सोनोग्राफी विभाग, शव गृह विभागासाठी रुग्णालयाने निश्चित केलेल्या रकमेच्या पावत्या एडीट करून बनावट पावत्या तयार केल्या. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून निश्चित केलेल्या रकमेप्रमाणे पैसे घेऊन त्यांना तशी पावती देत असे. मात्र जमा झालेली रक्कम त्याने रुग्णालयाच्या खात्यावर जमा न करता कमी रकमेच्या खोट्या पावत्या दाखवून रुग्णालयाची ६८ हजार २६० रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Case registered against cashier of YCM hospital, embezzlement of money by editing bill receipts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.