महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:21 PM2017-11-22T15:21:19+5:302017-11-22T15:24:41+5:30

मुलासह तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अस्लम जमाल शेख (वय २७) याच्याविरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

In the case of suicide of the woman filed a complaint against her husband in Khadki police station | महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे५० हजार रुपये आणावेत, या मागणीसाठी महिलेचा केला जात होता शारिरिक, मानसिक छळत्रास असह्य झाल्याने २० नोव्हेंबरला महिलेने स्वीकारला आत्महत्येचा मार्ग

पिंपरी : दापोडी येथील हॅरिस पुलावरून दोन वर्षाच्या मुलासह महिलेने मुळा नदीत उडी मारून आत्महत्या केली. मुलासह तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अस्लम जमाल शेख (वय २७) याच्याविरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  शहापुरी असलम शेख (वय २०, रा. वाकड) असे महिलेचे नाव आहे. तर जिशान अस्लम शेख असे मृत झालेल्या दोन वर्षाच्या मुलाचे नाव आहे. टेम्पो घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावेत, या मागणीसाठी तिचा शारिरिक, मानसिक छळ केला जात होता. सोमवारी  सायंकाळी हॅरिश पुलावरून महिलेने, दोन वर्षाच्या मुलासह मुळा नदीपात्रात उडी घेतली. त्यात तिचा व मुलाचा मृत्यू झाला. पतीच्या छळाला कंटाळुन तिने मुलासह नदीत उडी मारून जीवन संपविले. अशी तक्रार रब्बाना अब्बास शेख (वय ३५, रा. परांडा, जि. उस्मानाबाद) यांनी पोलिसांकडे दिली आहे. शहापुरी अस्लम शेख (वय २०, रा. जमदाडे वस्ती, वाकड) या महिलेने दोन वर्षाच्या मुलासह पुलावरून उडी मारली. त्या दिवशी सकाळी पतीबरोबर तिचा वाद झाला होता. लग्नानंतर वेळोवेळी तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. हा त्रास असह्य झाल्याने तिने २० नोव्हेंबरला आत्महत्येचा मार्ग स्वीकारून स्वत: सह मुलाचे जीवन संपविले.

Web Title: In the case of suicide of the woman filed a complaint against her husband in Khadki police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.