पिंपरीतून चोरी करून बीडमध्ये विक्री, ४४ दुचाकी जप्त; चोरीचे वाहने खरेदी केल्याने गुन्हा दाखल
By रोशन मोरे | Published: April 8, 2023 05:51 PM2023-04-08T17:51:48+5:302023-04-08T17:52:20+5:30
कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल ...
पिंपरी : कमी किंमतीत दुचाकी मिळते म्हणून विकत घेताना ती चोरीची नाही ना, याची खात्री करा. कारण वाकड पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या पाच चोरट्यांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून २१ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या तब्बल ४३ दुचाकी जप्त केला. एका जिल्हातून दुचाकी चोरून दुसऱ्या जिल्ह्यात विकणाऱ्या या चोरट्यांवर पोलिसांनी कारवाई केलीच. शिवाय कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांनी नावे केशव महादेव पडोळे (वय २५, रा. बोडकेवाडी, माण, मुळगाव- केशसांगवी, आष्टी, बीड), नवनाथ सुरेश मेटकुळे (रा. थेरगाव, मुळगाव- पाथर्डी,नगर), ऋषिकेश अजिनाथ भोपळे (वय २३, रा. आष्टी, बीड), अमोेल दगडू पडोळे (वय २४, रा.केळसांगवी, बीड) याला अटक केली असून नितीन राजेंद्र शिंदे (वय २०, रा. शेकापूर शिेंदेवस्ती, आष्टी, बीड) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तापकीर मळा चौक येथे दुचाकीचोर दुचाकीची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्याप्रमाणे प्रमाणे सापळा रचून नितीन शिंदे याला ताब्यात घेतले. त्याने दुचाकीचोरीचा मुख्य सुत्रधार केशव महादेव पडोळ असल्याचे सांगितले. पोलिसानी कारवाई करत आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव पडोळे हा पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालक म्हणून काम करतो. नवनाथ मेटकुळे तसेच इतर साथीदारांनी चोरलेल्या दुचाकी तो नगर येथे घेऊन जात होता. तेथून तो पुढे आरोपी अमोल आणि ऋषिकेशच्या मदतीने चोरीच्या दुचाकी बीडमध्ये विक्री करत होता.
बीडच्या ग्रामीण भागात विक्री
आरोपी कमी कमीत दुचाकीची विक्री बीडच्या ग्रामीण भागात करत होते. अगदी कमी किंमतीती दुचाकी मिळत होती म्हणून अनेक जण ती खरेदी करत होते. कागदपत्रांबाबत दुचाकी घेणाऱ्याने विचारणा केली असता. कागदपत्र लवकरच देऊ असे आश्वासन देत होते.
चोरट्यांकडून जप्त केलेल्या दुचाकीेचे दाखल गुन्हे
वाकड पोलीस ठाणे - १४
हिंजवडी पोलीस ठाणे -४
बारामती शहर पोलीस ठाणे - ८
रांजनगाव एमआयडीसी पोलीस ठाणे - ३
अहमदनगर कॅम्प पोलीस ठाणे - २
पाथर्डी पोलीस ठाणे - १
कर्जत पोलीस ठाणे - १
कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर - १
श्रीगोंदा पोलीस ठाणे - १
वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाणे, औरंगाबाद - १