बनावट एटीएम कार्डद्वारे एटीएममधून काढली रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 06:56 PM2018-09-28T18:56:46+5:302018-09-28T18:58:18+5:30
बनावट एटीएम कार्ड तयार करुन अज्ञात व्यक्तीने एकाच्या बँक खात्यातून परस्पर ऐंशी हजारांची रक्कम काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी : बनावट एटीएम कार्ड तयार करुन अज्ञात व्यक्तीने एकाच्या बँक खात्यातून परस्पर ऐंशी हजारांची रक्कम काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी राजीवकुमार कामताप्रसाद सिन्हा (वय ४२, रा. इंदिरा कॉलेजशेजारी, ताथवडे, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिन्हा यांचे एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्ड आहे. एका अज्ञात व्यक्तीने या कार्डप्रमाणेच दुसरे बनावट एटीएम कार्ड तयार केले. तसेच सिन्हा यांच्या परस्पर त्यांच्या बँक खात्यातून ८० हजारांची रोकड काढून घेतली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिन्हा यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.