‘सीसीटीव्ही’ने चोर पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:19 AM2018-08-30T01:19:26+5:302018-08-30T01:19:49+5:30

पॅण्टमध्ये कटावणी अडकवून फिरत असताना, बंद सदनिका दिसताच, त्या ठिकाणी दिवसाढवळया चोऱ्या करायची, अशी पद्धत अवलंबलेले दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

CCTV takes the thief in the hands of the police | ‘सीसीटीव्ही’ने चोर पोलिसांच्या हाती

‘सीसीटीव्ही’ने चोर पोलिसांच्या हाती

Next

पिंपरी : पॅण्टमध्ये कटावणी अडकवून फिरत असताना, बंद सदनिका दिसताच, त्या ठिकाणी दिवसाढवळया चोऱ्या करायची, अशी पद्धत अवलंबलेले दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीसीटीव्ही कॅमेºयांत दिसून आल्याने त्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह २१४.५ ग्रॅम वजनाचे सुमारे सहा लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. आतापर्यंत १८ घरफोड्या केल्या असून, त्यातील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडीच्या घडणाºया घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी ज्या परिसरात घरफोड्या झाल्या, त्या ठिकाणी गस्त वाढवली. तेथून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ११ आॅगस्टला सांगवीतील चंद्रहिरा सोसायटीच्या आवारात झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने तपास केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या वेळी चोरटे त्यात कैद झाल्याचे निदर्शनास आले. शिक्षक कॉलनीत राहणाºया रविकरण माताबदल यादव (वय २२) आणि अनुपम नरेंद्र त्रिपाठी (वय २४, रा. मोरया पार्क गल्ली) या दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली.

उत्तर प्रदेशात दागिन्यांची विक्री
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात चोरी कलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने चोरट्यांनी उत्तरप्रदेश चित्रकुट येथील सराफाला विकले आहेत. दोघेही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. आरोपी त्रिपाठी रियल इस्टेटचा व्यवसाय करीत असे, तर रविकिरण यादव याचे बाणेर येथे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. सांगवी परिसरात त्यांनी दिवसाढवळ्या तब्बल नऊ घरफोड्या केल्या आहेत.

Web Title: CCTV takes the thief in the hands of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.