खासदार आढळराव यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रसरकारने निर्यात मूल्य केले शून्य - आमदार सुरेश गोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 06:29 PM2018-02-03T18:29:18+5:302018-02-03T18:29:42+5:30
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रसरकारने निर्यात मूल्य शून्य केले, असे प्रतिपादन चाकण येथील आंदोलनात आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी केले
चाकण : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रसरकारने निर्यात मूल्य शून्य केले, असे प्रतिपादन चाकण येथील आंदोलनात आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी केले. कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने मार्केट यार्ड मध्ये आंदोलन करण्यात आले. काल शासनाने कांद्यावरील निर्यात मूल्य हटविल्याने नियोजित रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आले. मात्र मार्केटयार्ड मधील गणेश मंदिरात मोर्चा सभा घेण्यात आली.
कांद्याचे कोसळणा-या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला यामुळे दिलासा मिळाला असल्याचे गोरे यांनी मत व्यक्त केले.
आमदार सुरेशभाऊ गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, उप.जि.प्र.शिवाजी वर्पे, संपर्कप्रमुख संजय डफळ, जिल्हा समन्वयक ॲड. गणेश सांडभोर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख एल.बी. तनपूरे, माजी जि. प. सदस्य किरण मांजरे, लक्ष्मण जाधव, किरण गवारी, पांडुरंग गोरे, शेखर पिंगळे, पंचायत समितीच्या सभापती व त्यांचे सर्व सहकारी, शेतकरी बांधव, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, शहरप्रमुख, शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.