वायसीएममध्ये अपंगांना प्रमाणपत्र, राज्य शासनाचा आदेश : दोन रुग्णालयांत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:22 AM2017-10-26T01:22:33+5:302017-10-26T01:22:57+5:30
पिंपरी : दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे अपंगत्व प्रमाणपत्र अत्यंत सुलभरीत्या मिळावे, यासाठी हे प्रमाणपत्र आता सर्व महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
पिंपरी : दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे अपंगत्व प्रमाणपत्र अत्यंत सुलभरीत्या मिळावे, यासाठी हे प्रमाणपत्र आता सर्व महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य शासनातर्फे जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींनाही दोन रुग्णालयांत प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली.
महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि चिंचवड येथील तालेरा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, सध्या तालेरा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या जागेवर नूतन इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच तेथील अस्थिरोग विभागही कार्यान्वित नाही. त्यामुळे अपंगत्व प्रमाणपत्र वितरित करण्याची सुविधा सध्या तेथे उपलब्ध करण्यात आलेली नाही. ही सुविधा केवळ यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अपंगत्व प्रमाणपत्र
आवश्यक असणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्तींनी वायसीएम रुग्णालयातून ते प्राप्त
करून घ्यावे, ही सुविधा सुरू झाली आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केले आहे.