पोलीस असल्याची बतावणी करून नेहरूनगर येथील महिलेची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:04 PM2018-01-25T15:04:36+5:302018-01-25T15:07:01+5:30
नेहरूनगर येथील ६५ वर्षीय महिलेला पोलीस असल्याचे भासवून विश्वास संपादन करून तिच्याकडील ५० हजाराची सोनसाखळी भामट्यांनी पळविली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.
पिंपरी : नेहरूनगर येथील ६५ वर्षीय महिलेला पोलीस असल्याचे भासवून विश्वास संपादन करून तिच्याकडील ५० हजाराची सोनसाखळी भामट्यांनी पळविली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. पिंपरी पोलिसांकडे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिमद सिद्धकी ही ६५ वर्षीय महिला पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी या महिलेला दागिने काढुन देण्यास सांगितले. पोलिस असल्याचे भासवुन तिचा विश्वास संपादन केला, तिच्याकडील ५० हजारांचे दागिने घेऊन तेथून पोबारा केला. या प्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. वाकड, हिंजवडी परिसरात अशा घटना वारंवार घडत आहेत, शहराच्या मध्यवर्ती भागातही अशा घटना घडू लागल्याने माहिलांमधे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.