नेटबॉल स्पर्धेत चाकण संघ विजेता
By admin | Published: December 13, 2015 11:38 PM2015-12-13T23:38:16+5:302015-12-13T23:38:16+5:30
संपर्क संस्था, मळवली, भाजे व दिल्ली नेटबॉल समितीच्या वतीने संपर्क संस्था (मळवली) येथे आयोजित नेटबॉल स्पर्धेत चाकण येथील संघाने विजेतेपद पटकावले.
लोणावळा : संपर्क संस्था, मळवली, भाजे व दिल्ली नेटबॉल समितीच्या वतीने संपर्क संस्था (मळवली) येथे आयोजित नेटबॉल स्पर्धेत चाकण येथील संघाने विजेतेपद पटकावले. संपर्क भांबर्डे संघ स्पर्धेत उपविजेता ठरला. मुंबई, पुणे, लोणावळा, तळेगाव, चाकण, ठाणे, बदलापूर, बंगलोर, भांबर्डे येथील १२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. नेटबॉल प्रशिक्षण शिबिरात २०० जणांनी सहभाग घेतला होता.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे व ज्येष्ठ अभिनेते हरीश पटेल यांच्या हस्ते विजेत्यांना चषक देण्यात आले. उद्योजक शशिकांत कातळे, शरद चक्करपाटील, पोलीस उपनिरीक्षक दिलीप होले, राजू तेली, संपर्कचे संस्थापक अध्यक्ष अमितकुमार
बॅनजी, अनुज सिंग, नेटबॉल एज्युकेशन ट्रस्टचे आदित्य बी. आदी उपस्थित होते. मैदानी खेळामुळे मुलांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव मिळत असून, लढाऊ वृत्ती, हारजीत पचवण्याची ताकद व आव्हाने पेलण्याची क्षमता हे गुण प्रगल्भ होण्यास मदत होत असल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनीच पुस्तकी ज्ञानासोबत मैदानी खेळांना वेळ देणे गरजेचे, असे ढाकणे यांनी सांगितले.सूत्रसंचालन संपर्कचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर यांनी केले. (वार्ताहर)