Pimpri Chinchwad: गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाचा वापर करा
By रोशन मोरे | Published: September 22, 2023 05:50 PM2023-09-22T17:50:13+5:302023-09-22T17:50:36+5:30
याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले आहेत....
पिंपरी : गणेशोत्सव उत्साहात बुधवारी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दरम्यान, विसर्जनाच्या वेळी मिरवणुका निघाल्याने वाहतूक कोंडी होते. त्यासाठी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले आहेत.
सांगवी वाहतूक विभाग बदल-
सांगवी वाहतूक विभागांतर्गत सोमवारी (दि. २५) दुपारी चार ते रात्री १२ या कालावधीत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
- कृष्णा चौकाकडून फेमस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक पाण्याची टाकी जुनी सांगवी महात्मा फुले पुलाकडून इच्छितस्थळी जातील.
- माहेश्वरी चौकाकडून फेमस चौकाकडे माकण रुग्णालय चौक जुनी सांगवीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक बँक ऑफ महाराष्ट्र जुनी सांगवीमार्गे औंध किंवा पाण्याची जुनी टाकी सांगवीमार्गे महात्मा फुले पुलावरून इच्छित स्थळी जातील.
- कृष्णा चौकाकडून साई चौक ते माहेश्वरी चौककडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक काटे पूरम चौकाकडून डावीकडे वळून मयूरनगरी-एम के हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म -बा. रा. घोलप- महात्मा फुले पुलावरून इच्छितस्थळी जातील.
- कृष्णा चौकाडून क्रांती चौक\ फेमस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद
पर्यायी मार्ग - काटे पूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा. रा. घोलप-महात्मा फुले पुलावरून इच्छितस्थळी जातील.
- कृष्णा चौकाकडून साई चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग - काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा. रा. घोलप-महात्मा फुले पूलमार्गे.
- साई चौक तसेच कृष्णा चौकाकडून जुनी सांगवी पाण्याच्या टाकीकडे जाण्यास वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग- बा. रा. घोलप-ढोरे फार्म-एमके हॉटेल-मयूरनगरी-काटे पूरम चौकमार्गे वाहनचालक इच्छितस्थळी जातील.
- पाण्याची टाकी जुनी सांगवी ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक तसेच शितोळे पेट्रोल पंपाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग - साई चौकातून पाण्याची टाकी जुनी सांगवी पोलिस चौकीजवळून महात्मा फुले पुलाकडून औंध मार्गे. चिंचवड वाहतूक विभाग वाहतुकीत बदल
चिंचवड वाहतूक विभाग-
चिंचवड वाहतूक विभागांतर्गत गुरुवारी (दि.२८) दुपारी तीन ते मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
- अहिंसा चौक ते चाफेकर चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीला बंदी
पर्यायी मार्ग - एसकेएफ चौकातून खंडोबा माळकडून मुंबई-पुणे महामार्गाने इच्छित स्थळी जातील.
- दळवीनगर पुलाकडून चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग- एसकेएफ चौकाकडून बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
- वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चाफेकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग : वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसके एक मार्गे खंडोबामाळ मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
- लिंकरोडवरून चाफेकर चौकातील पीएमटी बसस्टॉप येथून चाफेकर चौकात जाण्यास वाहनांना प्रवेश
- पर्यायी मार्ग : लिंकरोडने येणारे वाहनचालक डावीकडे वळून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
- भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी.
- पर्यायी मार्ग : केशवनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
- चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रिव्हर व्हयु चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : चिंचवडे फार्म वाल्हेकरवाडी लंडनब्रिज रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील.
-अहिंसा चौक व रिव्हर व्हयु चौकाकडून चाफेकर उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी
- पर्यायी मार्ग : रिव्हर व्ह्यू चौककडून वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी व अहिंसा चौक ते महावीर चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.