दहा प्रभागांतील यादीत बदल
By admin | Published: January 24, 2017 02:17 AM2017-01-24T02:17:22+5:302017-01-24T02:17:22+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, त्यासाठी प्रारूप मतदारयादी अंतिम करण्यात आली. या निवडणुकीसाठी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, त्यासाठी प्रारूप मतदारयादी अंतिम करण्यात आली. या निवडणुकीसाठी ११ लाख ९१ हजार ७२० मतदार असणार असून, अंतिम यादीत दहा प्रभागांतील भागयाद्यांमध्ये बदल केला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक विभागाने प्रभागरचना, आरक्षण आणि मतदारयादीचे काम पूर्ण केले आहे. प्रारूप मतदारयादीनुसार शहरातील ३२ प्रभागांसाठी सुनावणीत सहाशेहून अधिक हरकती आल्या होत्या. त्यात अपूर्ण नाव, प्रभागातील बदल, परिसरातील बदल अशा तक्रारी होत्या. तसेच सर्वाधिक तक्रारी प्रभाग दोन आणि आठ संदर्भातील त्यापाठोपाठ प्रभाग सोळा आणि सतरामधील होत्या. परिसराची, प्रभागाची अदलाबदल अशा तक्रारी अधिक होत्या. प्रभाग ८ मधील सुमारे दहा हजार नावे प्रभाग दोनमध्ये इंद्रायणीनगर प्रभागातील मोशी प्रभागात नावे जोडल्याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांना आक्षेप नोंदविला होता. त्यावर प्रशासनाच्या वतीने कार्यवाही केली. (प्रतिनिधी)