तोटा कमी करण्यासाठी मार्गफलक बदलणार

By admin | Published: February 7, 2017 03:03 AM2017-02-07T03:03:31+5:302017-02-07T03:03:31+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) केवळ ब्रेकडाऊन, नियोजनाचा अभाव या कारणांमुळे आर्थिक तोटा होत असून, मार्गफलकही डोकेदुखी ठरत आहेत

To change the pathway to reduce the losses | तोटा कमी करण्यासाठी मार्गफलक बदलणार

तोटा कमी करण्यासाठी मार्गफलक बदलणार

Next

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) केवळ ब्रेकडाऊन, नियोजनाचा अभाव या कारणांमुळे आर्थिक तोटा होत असून, मार्गफलकही डोकेदुखी ठरत आहेत. मार्गफलकांवर ठिकाणांचे योग्य उल्लेख नसल्याने अशा बसेसकडे प्रवाशांकडून पाठ फिरविली
जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने जवळपास ८६ मार्गफलक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवासी वाढविणे तसेच आर्थिक तोटा कमी करण्यासाठी पीएमपीतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ब्रेकडाऊन तसेच अनियमित वेळापत्रकामुळे प्रवाशांमध्ये नारजी आहे. त्यातच आता मार्गफलकांचीही भर पडल्याचे दिसते. शहराबाहेरील तसेच शहरातील इतर भागाबद्दल माहिती नसणाऱ्या प्रवाशांना पीएमपी बसचे मार्गफलक डोकेदुखी ठरत आहेत. पीएमपी साधारण शहरात तसेच शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये जाते. पीएमपीकडून ३७४ मार्गांवर बस सोडल्या जातात. मात्र काही मार्गावर धावणाऱ्या बसचे मार्गफलक प्रवाशांना अडचणीचे ठरत आहेत. संबंधित मार्गावर नियमित प्रवास करणारे, तसेच संबंधित ठिकाण माहिती असलेल्या प्रवाशांकडून या बसचा वापर केला जातो.मार्गफलक बदलल्यानंतर पीएमपीचेही नुकसान कमी होणार आहे. प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: To change the pathway to reduce the losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.