डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल
By प्रकाश गायकर | Published: April 12, 2024 08:31 PM2024-04-12T20:31:36+5:302024-04-12T20:31:56+5:30
पिंपरी, भोसरी, हिंजवडी, सांगवी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून रविवारी (दि. १४) दुपारी १२ पासून मिरवणुका संपेपर्यंत असणार आहे
पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात मिरवणुका काढल्या जातात. तसेच पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी येत असतात. या पार्श्वभूमीवर पिंपरी, भोसरी, हिंजवडी, सांगवी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल रविवारी (दि. १४) दुपारी १२ पासून मिरवणुका संपेपर्यंत असणार आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिले आहेत.
महावीर चौक चिंचवड कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्विस रोडने जाणाऱ्या वाहतुकीस बंदी असेल. या मार्गावरील वाहने चिंचवड डी मार्ट इन ग्रेड सेपरेटर मार्गे जातील. नाशिक फाट्याकडून बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्विस रोडने येणाऱ्या वाहनांनाही बंदी असेल. ही वाहने डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पेट्रोल पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन मार्गे जातील. स्व. इंदिरा गांधी पूल ते बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी राहिल. ही वाहने मोरवाडी चौकातून जातील. नेहरूनगर चौकाकडून बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व वाहनांना बंदी असेल. या मार्गावरील वाहने कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनी मार्गे जातील.
जय मल्हार खानावळ सम्राट चौक पासून मोरवाडी चौकाकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद असेल. सायन्स पार्ककडून मोरवाडी चौकाकडे येणारा मार्ग बंद असेल. या मार्गावरील वाहने ऑटो क्लस्टर कडून मदर टेरेसा उड्डाणपुलावरून जातील. क्रोमा शोरूम कडून गोकुळ हॉटेल कडे जाणारा मार्ग बंद असेल. पिंपरी चौकाकडून पिंपरी पुलाकडे जाणारा मार्ग आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. तसेच अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांसाठी संत तुकाराम नगर जवळील एचए कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
दापोडीत असा असेल बदल
हॅरिस ब्रिज ते फुगेवाडी चौक सर्विस रस्त्याने जाण्यास प्रवेश बंद असेल. हॅरीस ब्रिजने ग्रेड सेपरेटर मार्गे जाता येईल. बोपोडी संविधान चौकाकडून दापोडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जाण्यास बंदी असेल. या मार्गावरील वाहने हॅरिस ब्रिज दापोडी मार्गे इच्छित स्थळी जातील. शितळा देवी चौकाकडून दापोडी गावाकडे जाण्यास बंदी असेल. या मार्गावरील वाहने शितळादेवी चौकाकडून सांगवी मार्गे जातील. जुनी सांगवी पीएमपीएमएल शेवटचा बस स्टॉप नदी पुलावरून दापोडीकडे जाण्यासंबंधी असेल. या मार्गावरील वाहनांना माकन चौक किंवा ममता नगर चौकातून जाता येईल.
हिंजवडी परिसर
कस्तुरी चौक ते श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना बंदी असेल. या मार्गावरील वाहने कस्तुरी चौक येथून उजवीकडे वळून विनोदी वस्ती मार्गे व डावीकडे वळून इंडियन ऑइल चौक मार्गे जातील. मेझा ९ चौकाकडून हिंजवडी गावठाणाकडे जाणारी वाहतूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जाऊन इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे जाईल. जांभुळकर जिम चौकाकडून हिंजवडी गावठाणाकडे जाणारी वाहतूक जांभुळकर जिम चौकातच यु टर्न घेऊन परत इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे जाईल. मेझा ९ चौकाकडून श्री शिवाजी महाराज चौक कडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद असेल. सर्व वाहतूक उजव्या बाजूच्या लेनने सुरू राहील.