हवेत कोयते नाचवून दंगा करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल ; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 08:34 PM2021-08-03T20:34:05+5:302021-08-03T20:36:09+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे.

Charges filed against seven people for weopan carring; Both arrested | हवेत कोयते नाचवून दंगा करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल ; दोघांना अटक

हवेत कोयते नाचवून दंगा करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल ; दोघांना अटक

Next

पिंपरी : हवेत कोयते नाचवून दंगा करणाऱ्या सात जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. ०२) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास सिद्धार्थनगर ओटास्कीम येथे घडली.

अकबर इस्माईल शेख (वय १९), आजिनाथ बबन कांबळे (वय २१), विशाल अरुण कांबळे, गणेश जाधव (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) आणि त्यांचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबर आणि अजिनाथ या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. असे असताना आरोपींनी सोमवारी दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास आझाद चौकाकडून काळभोर गोठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिद्धार्थनगर ओटास्कीम येथे कोयते बाळगून ते हवेत नाचवून दंगा केला. तसेच लोकांमध्ये दहशत निर्माण केली. आरोपींनी केलेल्या या दहशतीमुळे लोक घाबरून रस्त्याने सैरावैरा पळत होते. तसेच लोकांनी घराचे दरवाजे बंद केले. याबाबत कारवाई करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Charges filed against seven people for weopan carring; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.