मुख्य निवडणूक आयुक्तांची वडगाव मावळला पाहणी
By admin | Published: February 20, 2017 02:53 AM2017-02-20T02:53:12+5:302017-02-20T02:53:12+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य जे. एस. सहारिया यांनी येथील तहसील कार्यालयाला भेट दिली.
वडगाव मावळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य जे. एस. सहारिया यांनी येथील तहसील कार्यालयाला भेट दिली.
सहारिया यांनी मतदानप्रक्रिया तयारीची माहिती घेतली. सोमवारी (दि. २०) होणाऱ्या मतदान साहित्य वाटपाबाबत चैकशी केली. साहित्य व्यवस्थित पेटीत जमा केले आहे की नाही याची खातरजमा करून घेतली. निवडणूक मतमोजणी कक्षाला भेट देऊन सुरक्षा कक्षाची पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
मतदान कामाची तहसील कार्यालयाने केलेली तयारी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुभाष भागडे, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार जोगेंद्र कट्यारे, मंडलअधिकारी व तलाठी तसेच पोलीस निरीक्षक प्रदीप काळे उपस्थित होते. (वार्ताहर)