मुख्यमंत्र्यांनी ‘आक्रोश’ ऐकला, हमीभावाच्या कायद्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:38 AM2017-11-22T01:38:56+5:302017-11-22T01:39:13+5:30

पाटस : दौंड तालुक्यातील कानगाव येथे सुरू असलेला शेतक-यांचा आक्रोश २० दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या कानी पडला.

The Chief Minister heard the 'shouting', will send a proposal to the Center for the Guilt Act | मुख्यमंत्र्यांनी ‘आक्रोश’ ऐकला, हमीभावाच्या कायद्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार

मुख्यमंत्र्यांनी ‘आक्रोश’ ऐकला, हमीभावाच्या कायद्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार

Next

पाटस : दौंड तालुक्यातील कानगाव येथे सुरू असलेला शेतक-यांचा आक्रोश २० दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या कानी पडला. त्यांनी मंगळवारी शेतकºयांच्या शिष्टमंडळाला बोलावून चर्चा केली. शेतकºयांनी उत्पादित केलेल्या मालाला हमीभावाचा कायदा करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले.
या वेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार राहुल कुल, कानगावचे सरपंच संपत फडके, उपसरपंच बाबूराव कोºहाळे, माऊली शेळके, अ‍ॅड. भास्कर फडके, भानुदास शिंदे, महादेव चौैधरी, उत्तम खांदवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कानगावच्या आंदोलक शिष्टमंडळातील प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस म्हणाले, की हमीभावाचा कायदा हा केंद्र शासनाशी निगडित आहे. दरम्यान कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी चर्चा करून हमीभावाचा कायदा व्हावा, म्हणून प्रस्ताव
केंद्राकडे पाठविण्यात येईल. दुधाला २७ रुपये हमीभाव देण्यासंदर्भात शासकीय दूध संकलनातून शेतकºयाला बाजारभाव
देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणार आहे, तर कृषी कर्जाची मर्यादा वाढविणार आहे.
बाजारमूल्याच्या आधारित शेतकºयांना ८० टक्के मध्यम मुदतीचे कर्ज देण्यात येणार आहे, की ज्याची परतफेड १० वर्षांची असेल. एकंदरीतच, शेतकरी कर्जमुक्त कसा होईल आणि त्याच्या डोक्यावर कर्ज राहणार नाही, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले.
शेतकºयांची वीज तुटली जाणार नाही आणि शेतकºयांना अडचणीत आणू नका, या संदभांत संबंधित खात्याशी चर्चा करणार असल्याचे शेवटी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना आश्वासन दिले.
>न्हावरेत रास्ता रोका
रांजणगाव सांडस : दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकºयांना पाठिंबा देत शिरूर तालुक्यात न्हावरा ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन व गाव बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष व माजी उपसरपंच सागरराजे निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अ‍ॅड् वसंत काका कोरेकर, घोडगंगा कारखान्याचे संचालक गोविंद काका निंबाळकर, सुरेश कोरेकर, शिरुर राष्ट्रवादी सा. न्याय विभागाचे अध्यक्ष महादेवआण्णा जाधव, बापू काळे, बापू कुटे आदी मान्यवरांची भाषणे झाली. याप्रसंगी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब कोरेकर, माजी उपसरपंच संभाजी बिडगर, पै. कैलाशजी पवार, हिरामण मासाळ, बबलू थिटे आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
>कानगावला आंदोलनाची
आज दिशा ठरणार
कानगाव (ता. दौैंड) येथे राज्यव्यापी आक्रोश आंदोलन सुरू होते. दरम्यान, मंगळवारी (दि. २१) येथील विठ्ठल मंदिरात २०व्या दिवशी आंदोलन कायम होते. बुधवारी (दि. २२) कानगावला सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळात झालेल्या बैठकीचा वृत्तांत ग्रामस्थांना सांगण्यात येईल. त्यानुसार ग्रामस्थांनी सांगितले, की आंदोलन स्थगित करा, तर आंदोलन स्थगित केले जाईल आणि ग्रामस्थांनी सांगितले, की आंदोलनाची व्याप्ती वाढवा, तर आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल, असे आंदोलकांनी सांगितले.

Web Title: The Chief Minister heard the 'shouting', will send a proposal to the Center for the Guilt Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.