मुख्यमंत्री डिसेंबरमध्ये करणार नव्या आयुक्तालयाच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 03:59 PM2018-11-12T15:59:41+5:302018-11-12T16:03:26+5:30

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या इमारतीचे उद्घाटन करून नव्या आयुक्तालयाची सुरवात होईल याची तयारी सुरू झाली आहे.

Chief Minister inaugurates new Commissioner Office in December | मुख्यमंत्री डिसेंबरमध्ये करणार नव्या आयुक्तालयाच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन

मुख्यमंत्री डिसेंबरमध्ये करणार नव्या आयुक्तालयाच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देचिंचवड मधील नव्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यातआयुक्तालयाच्या कामाला वेग आला असून २५ नोव्हेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना नवीन आयुक्तालयासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही

चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराच्या नवीन आयुक्तालयाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीचे काम अंतिम टप्यात आले आहे.डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन त्यांच्या हस्ते नव्या इमारतीत प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.यामुळे आयुक्तालयाच्या इमारतीत लवकरच कामकाज सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 
चिंचवड मधील प्रेमलोकपार्क मध्ये नवीन आयुक्तालयाच्या इमारतीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,विधिसमिती अध्यक्षा माधुरी कुलकर्णी, नगरसेवक नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्षा, नगरसेविका करुणा चिंचवड यांच्या सह प्रधासनाच्या विविध विभागातील अधिकानीभेट दिली. 
नव्या आयुक्तालयाच्या कामाला वेग आला असून २५ नोव्हेंबरपर्यंत उर्वरित सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नव्या आयुक्तालयाच्या इमारतीचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे.या इमारतीत नवीन बांधकाम,रंगरंगोटी,रस्ते,फर्निचर अशा विविध प्रकारची काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. इमारतीचे काम सुरू असल्याने १५ आॅगस्ट रोजी चिंचवड मधील आॅटो क्लस्टर मधील जागेत तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली.नवीन इमारतीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी आयुक्तालयाचा पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन व अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी वेळोवेळी भेट देऊन कामाची पाहणी केली. आवश्यक असणारे बदल करण्यात आले असून हे काम आता अंतिम टप्यात आहे.डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या इमारतीचे उद्घाटन करून नव्या आयुक्तालयाची सुरवात होईल याची तयारी सुरू झाली आहे.
नवीन आयुक्तालयासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही होईल, असा आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत पुणे शहर पोलीस अधिकाऱ्यांना दिला होता. 
याच अनुषंगाने नवीन कर्मचारी व काही अधिकारी नव्या आयुक्तालयासाठी देण्यात आले आहेत. आता नव्या इमारतीत आयुक्तालयाचा कारभार सुरू होण्यासाठी थोडा अवधी राहिला आहे. 

Web Title: Chief Minister inaugurates new Commissioner Office in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.