राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारा मुख्यमंत्री - शरद पवार
By admin | Published: February 18, 2017 10:33 PM2017-02-18T22:33:37+5:302017-02-18T22:33:37+5:30
राठी माणसाच्या त्यागातून साकारलेल्या या राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत अशी टीका शरद पवारांनी केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. १८ - राज्याचा प्रमुख या नात्याने राज्याची राज्य एकसंध ठेवणे, हे मुख्यमंत्र्याचे आद्य कर्तव्य ठरते. परंतु मुख्यमंत्री पदावर येताच महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करण्याची भूमिका घेतली जाते. मराठी माणसाच्या त्यागातून साकारलेल्या या राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगवी येथे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगवी येथे माजी केंद्रीय मंत्री पवार यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गुजरातपासून महाराष्ट्र वेगळा करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला गेला. त्यात मराठी माणसाचे रक्त सांडले. मराठी भाषिकाच्या त्यागातुन महाराष्टÑ राज्य अस्तित्वात आले. ही मराठी अस्मिता जपण्याऐवजी तोडण्याचे काम राज्याच्या प्रमुखाकडून केले जात आहे. ही दुदैवार्ची बाब आहे. ५० वर्षे राजकारणात आहेत. या कालावधित अशा पद्धतीने भूमिका निभावणारा हा पहिलाच राज्यकर्ता आहे.