दुस-या मजल्यावरून पडून बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:31 AM2018-01-02T02:31:24+5:302018-01-02T02:31:32+5:30

इमारतीच्या दुस-या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्रांक अमोल मंजाळ या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. काळेवाडी येथील तापकीरनगरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी १२च्या सुमारास ही घटना घडली.

 The child died from the second floor and died | दुस-या मजल्यावरून पडून बालक ठार

दुस-या मजल्यावरून पडून बालक ठार

Next

रहाटणी : इमारतीच्या दुस-या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्रांक अमोल मंजाळ या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. काळेवाडी येथील तापकीरनगरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी १२च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्रांक हा दुपारी बबाई निवास या इमारतीच्या दुसºया मजल्यावरील गॅलरीत खेळत होता. खेळत असताना तो दुपारी बाराच्या सुमारास खाली पडला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी बालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर
केले.
शहरातील पाचवी घटना
वाकडमध्ये अशीच दुर्घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. त्या घटनेत सातव्या मजल्यावरून पडून बालक ठार झाले. हिंजवडीत मोटार मागे घेत असताना चिमुकल्याचा जीव गेल्याची घटना घडली. भोसरीत शेगडीशेजारी बसलेली चिमुकली होरपळून दगावली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खड्ड्यात पडून दोन लहान मुलांचे बळी गेले. पालकांनी निष्काळजीपणा दाखविल्यामुळे बालक दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी जागरूकता दाखवली, तरच अशा घटनांना आळा बसू शकेल. अशा घटना रोखण्यासाठी पालकांनी सतर्क रहावे.

Web Title:  The child died from the second floor and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू