दिवाळीपूर्वीची गर्दी, चिंचवड स्टेशन आणि किंचाळ्या...! चिमुकल्या सिंहगड एक्प्रेसमध्ये चढले, आई स्टेशनवरच राहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 10:11 AM2023-11-08T10:11:17+5:302023-11-08T10:33:02+5:30

गर्दीमुळे रेल्वे सुटल्याने आईवडील आणि चिमुकल्या मुलींची ताटातूट होऊन मुले रेल्वेत राहिली. त्यानंतर पालकांनी ही घटना पोलिसांच्या कानावर घातली असता त्यांनी तपासाची सुत्रे जलद गतीने चालवत या माऊलीला त्यांच्या मुलांची भेट घडवून आणली....

Children lost at Chinchwad station, children's mother recovered in Lonavala | दिवाळीपूर्वीची गर्दी, चिंचवड स्टेशन आणि किंचाळ्या...! चिमुकल्या सिंहगड एक्प्रेसमध्ये चढले, आई स्टेशनवरच राहिली

दिवाळीपूर्वीची गर्दी, चिंचवड स्टेशन आणि किंचाळ्या...! चिमुकल्या सिंहगड एक्प्रेसमध्ये चढले, आई स्टेशनवरच राहिली

पुणे : आई आणि चिमुकल्या मुलींची ताटातूट नंतर रडण्याचा आवाज आणि जवळपास दोन तासानंतर आई-वडीलांना पाहिल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आईने मारलेली घट्ट मिठी. चिमुकल्या मुली आपल्या आईच्या कुशीत स्थिरावल्यानंतर पोलिस आणि काही सतर्क नागरिक ज्यांनी त्या मुलींची समजूत काढली होती त्यांच्या चेहऱ्यांवरही आनंद होता. दिवसाची सुरूवात एका चांगल्या कामाने झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.

ही घटना आहे सिंहगड एक्सप्रेसमधली. पुण्यातून ट्रेन निघाली. चिंचवड स्टेशन आले, दिवाळीमुळे स्टेशनवर गर्दीचा उच्चांक झाला होता. अशात एक कुटूंब आपल्या लहान मुलींना घेऊन ट्रेनमध्ये चढत होते. मुलींना त्यांनी गाडीत बसवले पण स्वतः त्यांनाच ट्रेनमध्ये चढता आले नाही. त्यानंतर लगेच त्यांनी जवळील आरपीएफ जवानांकडे मदत मागितली. त्यांनी लोणावळामधील जवानांशी संपर्क साधून ही घटना कानावर घातली. लोणावळा आल्यानंतर तेथील जवानांनी त्या मुलींना आपल्या ताब्यात घेतले. तेथील स्टेशन मास्तरांकडे मुलांना नेण्यात आले. काही वेळांनी पालक लोणावळ्यात आल्यानंतर त्यांची भेट झाली. 

सिंहगड एक्स्प्रेसला चिंचवडनंतर थेट लोणावळा येथे थांबा आहे. त्यामुळे ट्रेन लोणावळा येथे थांबली असता ट्रेन मधील काही प्रवाशांनी त्या मुलींना पोलिसांच्या ताब्यात दिले. तोपर्यंत पालक मागून लोकलने लोणावळ्याला गेले. लोणावळा येथे पालकांची आणि मुलींची भेट झाली.

Web Title: Children lost at Chinchwad station, children's mother recovered in Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.