बालकलाकाराचा अंध मित्रांसोबत वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 04:00 AM2017-08-13T04:00:51+5:302017-08-13T04:00:51+5:30

वाढदिवस म्हटले, की तो थाटमाटात साजरा करण्याचे फॅड आहे; पण आपल्यासारख्या कोवळ्या वयातील अंध मित्रांसोबत बालकलाकार आर्या घारे हिने वाढदिवस नुकताच साजरा केला.

Children's Day Birthday With Blind Friends | बालकलाकाराचा अंध मित्रांसोबत वाढदिवस

बालकलाकाराचा अंध मित्रांसोबत वाढदिवस

Next

- नितीन शिंदे ।
भोसरी : वाढदिवस म्हटले, की तो थाटमाटात साजरा करण्याचे फॅड आहे; पण आपल्यासारख्या कोवळ्या वयातील अंध मित्रांसोबत बालकलाकार आर्या घारे हिने वाढदिवस नुकताच साजरा केला. त्यानंतर या अंधमित्रांच्या मदतीसाठी तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवून आवाहन केले आहे.
दृष्टिहीन बांधवांना सहानभूती नको, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आधार द्या, असे आवाहन करताना आर्याने आपला वाढदिवस भोसरी येथील अंधशाळेत स्वत:च्या डोळ्यांवर पट्टी बांधून साजरा केला.
आर्या घारे या ९ वर्षांच्या मुलीने जवळपास १९ मराठी चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले आहे. अंध बांधवांसमवेत वाढदिवस साजरा करून मरणोत्तर नेत्रदानाचे आवाहन तिने केले आहे. नेत्रदानाबद्दल प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे लोकांनी जागृत होऊन नेत्रदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.

एक दिवस दृष्टिहीन बांधवांसाठी
दृष्टिहीनांचे आयुष्य किती खडतर असते, हे ती ऐकून होती. काहींना तर जन्मत:च दिसत नाही. त्यामुळे हे जग काय आहे हे माहीतच नसते, याची जाणीव तिला तिच्या आईने करून दिली. म्हणूनच तिने आपला वाढदिवस दृष्टिहीन बांधवांसमवेत साजरा करण्याचा संकल्प केला. वाढदिवस साजरा करताना त्यांच्यासाठी फक्त दोन मिनिटे आपणही डोळ्यांवर पट्टी का बांधू नये, असा विचार तिच्या मनात आला.
संपूर्ण आयुष्य अंधकारमय जीवन जगणाºया व्यक्तींसाठी आपण आपल्या आयुष्यातील
२ मिनिटे देऊन आर्या घारे हिने पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी अंध बांधवांसाठी योग्य उपक्रम व योजना राबवाव्यात; तसेच नेत्रदानाबाबत पावले उचलावीत, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

नेत्रदानाविषयी जागृती
सध्या नेत्रदानावर अनेक संस्था काम करीत आहेत. मात्र केवळ सर्वसामान्य नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत गैरसमज असल्यामुळे नेत्रदान करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक नेत्रदान केल्यामुळे मृत व्यक्तीला कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होत नाही. त्यामुळे नागरिकांनी नेत्रदानाबाबत जागृत राहावे या संकल्पनेतून आर्या घारे हिने भोसरीतील पताशीबाई लुंकड या अंधशाळेत आपला नववा वाढदिवस साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: Children's Day Birthday With Blind Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.