चिंचवडमध्ये भाजपाला २ जागा

By admin | Published: February 25, 2017 02:27 AM2017-02-25T02:27:08+5:302017-02-25T02:27:08+5:30

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवडमध्ये फोडला होता. याच वेळी त्यांनी शहरात भाजपाची सत्ता येईल

In Chinchwad, BJP has two seats | चिंचवडमध्ये भाजपाला २ जागा

चिंचवडमध्ये भाजपाला २ जागा

Next

चिंचवड : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवडमध्ये फोडला होता. याच वेळी त्यांनी शहरात भाजपाची सत्ता येईल, असा दावा केली होता. बहुतांश विद्यमान नगरसेवकांना विविध पक्षांतून उमेदवारी मिळाली होती. मात्र भाजपाचा एकही नगरसेवक नसणाऱ्या चिंचवड गावातील प्रभाग क्रमांक १८मध्ये यंदाच्या निवडणुकीत दोन नगरसेवक मिळाले आहेत. या प्रभागात अ गटातून सुरेश भोईर व ड गटातून राजेंद्र गावडे विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक संदीप चिंचवडे यांचा ९५१३ मतांनी पराभव केला आहे. चिंचवडे यांना ६३९२ मते मिळाली. याच प्रभागात भाजपाने कट्टर समर्थकांना डावलून भोईर यांना उमेदवारी दिली होती.यामुळे प्रबळ दावेदार समजले जाणारे मोरेश्वर शेडगे यांना पक्षाने नाकारले होते.माजी नगरसेवक शरद बाराहाते यांच्या सह प्रदीप सायकरही इच्छुक होते. आमदार लक्ष्मण जगताप यांना मानणारा मोठा गट या प्रभागात आहे. अंतर्गत गटबाजी होईल अशी चर्चा सुरु होती.तिकीट वाटपामुळे भाजपाचा नाराज गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र या घडामोडीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने सायकर यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली. मात्र ते ३७९१ मते घेत तिसऱ्या स्थानावर राहिले.काँग्रेसचे प्रदीप पवार व मनसेचे दहिफळे सर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत.यामुळे १५९०५ मते मिळवत भोईर यांनी एकतर्फी विजय मिळविला.
ब गटातून राष्ट्रवादीच्या माजी महापौर अपर्णा डोके यांनी १२२७० मते मिळविली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या माधुरी गुरव यांना ९४९० मते मिळविली, तर शिवसेनेच्या निकिता चिंचवडे यांना ६२८१ मते मिळाली. या गटात अन्य पक्षांचे व अपक्ष उमेदवार उभे नसल्याने तिरंगी लढत होणार हे स्पष्ट होते. या लढतीत डोके यांनी २७८० मतांनी विजय मिळविला. क गटातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका पुन्हा विजयी झाल्या. त्यांना १३४६० मते मिळाली. भाजपाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मयूरी कुलकर्णी (बंब) यांनी ९९१३ मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिल्या.या गटात राष्ट्रवादीच्या सरोज माने यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही.त्यांना २८५७ मते मिळाली.तर काँग्रेसच्या भाग्यश्री भोईर यांना १२१० मते मिळाली.या गटात क्रॉस मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अश्विनी चिंचवडे यांच्या कामामुळे मतदारांनी त्यांना पुन्हा संधी दिल्याचे समोर आले आहे. ड गटातून भाजपाचे राजेंद्र गावडे विजयी झाले. या गटात काटे की टक्कर होईल असा सर्वांचा अंदाज होता. गत निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर विजयी झालेल्या अनंत कोराळे यांनी या वेळी मनसेला राम राम करत शिवसेनेची उमेदवारी मिळविली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे यांचा मुलगा विजय यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढाईत राजेंद्र गावडे हे विजयी झाले. त्यांनी १०५३३ मते घेतली. कोराळे यांना ८५६८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजेश आरसूळ १०१६ मते, मनसेचे रवि गायकवाड ७१०, तर काँग्रेसचे सचिन
निंबाळकर यांना ४६१ मते मिळाली. भाजपाचे राजेंद्र गावडे १९६५ मतांनी विजयी झाले.(वार्ताहर)

Web Title: In Chinchwad, BJP has two seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.