Chinchwad By Election: चिंचवड पोटनिवडणुकीत 11 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 12:24 PM2023-02-26T12:24:24+5:302023-02-26T12:25:06+5:30

36 हजार 866 पुरुष तर 22 हजार 579 महिला अशा 59 हजार 437 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला

Chinchwad by-election 10 percent polling till 11 am | Chinchwad By Election: चिंचवड पोटनिवडणुकीत 11 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान

Chinchwad By Election: चिंचवड पोटनिवडणुकीत 11 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान

googlenewsNext

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान झाले आहे. तर नंतर 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के  एवढे मतदान झाले. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान झाले होते. 36 हजार 866 पुरुष तर 22 हजार 579 महिला अशा 59 हजार 437 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख 68 हजार 964 मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार 946 पुरुष तर दोन लाख 65 हजार 974 महिला आणि तृतीयपंथी 34 मतदार आहेत. दिव्यांग 12 हजार 313, 80 वर्षांवरील मतदारांची संख्या 9 हजार 926 आहे. तसेच अनिवासी भारतीय 337, सैनिक मतदार 168 या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहेत.

Web Title: Chinchwad by-election 10 percent polling till 11 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.