Chinchwad By-Election | अनधिकृत फलक लावल्याने आचारसंहिता भंगाच्या तब्बल ५९ तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 05:10 PM2023-02-22T17:10:15+5:302023-02-22T17:10:46+5:30

पोटनिवडणुकीमध्ये प्रचारासाठी अनधिकृत फलकबाजी...

Chinchwad By-Election As many as 59 complaints of violation of code of conduct for putting up unauthorized boards | Chinchwad By-Election | अनधिकृत फलक लावल्याने आचारसंहिता भंगाच्या तब्बल ५९ तक्रारी

Chinchwad By-Election | अनधिकृत फलक लावल्याने आचारसंहिता भंगाच्या तब्बल ५९ तक्रारी

googlenewsNext

पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रचारासाठी अनधिकृत फलकबाजी केली आहे. याबाबत निवडणूक विभागाकडे विविध ठिकाणांहून तब्बल ५९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींचे निरसन केले आहे.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना सी-व्हिजिल ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १८ जानेवारीपासून आचारसंहिता लागू आहे. २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन पद्धतीने करता येईल. यामध्ये अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे, मद्य, भेटवस्तूंचे वाटप किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे.

सी-व्हिजिल ॲपमुळे आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे सोयीचे झाले आहे. निवडणूक प्रशासनाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवली आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. या ॲपचा वापर मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत करता येईल. ॲपद्वारे तक्रारींचे छायाचित्र अथवा व्हिडीओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. ॲप वापरकर्त्यास आपली ओळख लपवूनसुद्धा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाइल नंबर आणि इतर प्रोफाइल तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत.

या पद्धतीने मतदारसंघामध्ये अनधिकृत फलक लावणे तसेच रस्त्यांवर पोस्टर चिटकवल्याने तब्बल ५९ आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. निवडणूक विभागाने त्याची दखल घेतली असून, तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.

भरारी पथकांकडून दखल

तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनिटांमध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात.

आचारसंहिता सुरू झाल्यापासून ५९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये अनधिकृतरीत्या फलक लावणे, पोस्टरबाजी करणे याचा समावेश होता. त्या सर्व तक्रारींचे निरसन केले आहे.

- सचिन ढोले, निवडणूक निर्णय अधिकारी.

Web Title: Chinchwad By-Election As many as 59 complaints of violation of code of conduct for putting up unauthorized boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.