Chinchwad By Election | चिंचवडमध्ये आश्विनी जगतापांची आघाडी, नाना काटे पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 09:06 AM2023-03-02T09:06:56+5:302023-03-02T09:11:21+5:30

मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत...

Chinchwad By Election Ashwini Jagtaps leading in postal votes, Nana Kata trailing behind | Chinchwad By Election | चिंचवडमध्ये आश्विनी जगतापांची आघाडी, नाना काटे पिछाडीवर

Chinchwad By Election | चिंचवडमध्ये आश्विनी जगतापांची आघाडी, नाना काटे पिछाडीवर

googlenewsNext

पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सुरुवात टपालाने प्राप्त झालेल्या मतदान मतमोजणीने आज सकाळी आठच्या सुमारास सुरुवात झाली. थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांचे प्रतिनिधी आणि निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतपेटी कक्षाचे सील काढण्यात आले. टपाली मतांत आश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती. सुरुवातींच्या फेऱ्यांमध्ये जगताप यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

तिसऱ्या फेरीनंतरही आश्विनी जगताप आघाडीवर आहेत. जगताप यांना ७ हजार ९९६ मते मिळाली असून तर मविआचे नाना काटे यांना ७ हजार ३४९ मते मिळाली आहेत. दुसरीकडे अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना ३ हजार ४६ मते मिळाले आहेत.

निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण, निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, निवडणूक सहाय्यक प्रशांत शिंपी,  थॉमस नरोन्हा, ईव्हीएम कक्षाचे समन्वयक बापूसाहेब गायकवाड, टपाली मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, डॅशबोर्डच्या समन्वयक अनिता कोटलवार, माध्यम कक्ष समन्वयक किरण गायकवाड, निवडणूक सहाय्यक तथा नायब तहसीलदार श्वेता आल्हाट, संतोष सोनवणे यावेळी उपस्थित होते.

मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना मतमोजणी विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने कर्तव्ये,  जबाबदा-या आणि आवश्यक कामकाज याबद्दल या प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती आणि सूचना देण्यात आल्या.

मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Chinchwad By Election Ashwini Jagtaps leading in postal votes, Nana Kata trailing behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.