मतमोजणीनंतर चिंचवडला तणाव
By admin | Published: October 5, 2015 01:44 AM2015-10-05T01:44:22+5:302015-10-05T01:44:22+5:30
शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोरया पॅनलला आठ जागा मिळाल्या. तर परिवर्तन पॅनेलला एक जागा मिळाली.
पिंपरी : शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोरया पॅनलला आठ जागा मिळाल्या. तर परिवर्तन पॅनेलला एक जागा मिळाली. प्रगती पॅनेलला या निवडणुकीत एकही जागा मिळू शकली नाही. मोरया पॅनलने परिवर्तनला मिळालेल्या एका जागेवरील उमेदवार निवडीबद्दल जोरदार आक्षेप नोंदविला. त्यामुळे मतमोडजीनंतर चिंचवडमध्ये तणावाचे वातावरण होते.
या पतसंस्थेच्या निवडणुकीत मोरया, प्रगती, परिवर्तन या तीन पॅनलचे उमेदवार रिंगणात होते. अटीतटीच्या या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या मोरया पॅनलने परिवर्तन पॅनलच्या एका उमनेदवाराबद्दल जोरदार आक्षेप नोंदविला. त्या जागेवरील मोरया पॅनलचे संतोष बेंद्रे केवळ एक मताने पराभूत झाले हे मान्य नाही असा त्यांनी वाद घातला. निवडणुक निर्णय अधिकारी एम. एन. लिंगळे यांच्याकडे विचारणा केली. केवळ एक मताने उमेदवार पराभूत झाला हे मान्य नाही. सर्वच्या सर्व जागा मोरया पॅनलला मिळू नयेत या उद्देशाने काहीतरी गडबड केली गेली असा आरोप त्यांनी केला.
मोरया पॅनलचे शरद लावंड यांनी फेरमतमोजणीची मागणी केली.
परंतु निवडणुक निर्णय अधिकारी लिंगळे यांनी आपण नियमाप्रमाणे काम केले असल्याचे सांगितले. दाद मागायची तर न्यायालयात मागा असे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)