चोविस तास अगोदर संपणार प्रचार

By admin | Published: January 25, 2017 06:57 PM2017-01-25T18:57:12+5:302017-01-25T18:57:12+5:30

चोविस तास अगोदर संपणार प्रचार

Choice propagate hours ago | चोविस तास अगोदर संपणार प्रचार

चोविस तास अगोदर संपणार प्रचार

Next

 

पिंपरी : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूकीतील आचासंहितेच्या कलमांमध्ये बदल केले आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत सुधारीत आदेश जारी केला आहे. त्यामध्ये महापालिका निवडणुकांसाठी जाहीर प्रचार बंदीचा कालावधी कोणता राहील याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला नाही. मुंबई महापालिका अधिनियमांमध्ये मतदान समाप्तीपूर्वीच्या ४८ तासांमध्ये प्रचाराकरिता कोणतीही सभा घेता येणार नाही, अशी तरतुद केली आहे. त्यामुळे चोविस तास अगोदर प्रचार थांबणार आहे.महापालिकेचे पडघम वाजू लागले आहेत. 

महापालिकेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मध्ये निवडणूकीसंदर्भात स्पष्ट तरतुद नाही. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकांमध्ये जाहीर प्रचार बंदीचा कालावधी मतदान समाप्तीच्या आधी ४८ तास इतका राहणार आहे.  निवडणुकीसाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्ष व इतर पक्षांनी जाहीर करावयाच्या महत्वाच्या पुढाºयांची संख्या निश्चित केली आहे. १४ आॅक्टोबर २०१६ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत सुधारीत आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसमवेत घेतलेल्या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडील मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष व इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्ष अशा एकुण १५ राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या जास्तीत जास्त ४० इतकी ठेवण्यास मान्यता दिली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेल्या इतर १९० पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या जास्तीत जास्त २० इतकी निश्चित केली आहे. 

 

Web Title: Choice propagate hours ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.