स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी चूरस; भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांना मिळणार असल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 05:13 AM2018-02-11T05:13:47+5:302018-02-11T05:14:01+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ सदस्य लकी ड्रॉ च्या माध्यमातून बाहेर पडले. त्याच्या जागेवर पुढील महिन्यात नवीन सदस्य निवडले जाणार आहे.

Chorus to be recruited for standing committee; Councilors from Bhosari constituency will get discussions | स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी चूरस; भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांना मिळणार असल्याची चर्चा

स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी चूरस; भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांना मिळणार असल्याची चर्चा

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ सदस्य लकी ड्रॉ च्या माध्यमातून बाहेर पडले. त्याच्या जागेवर पुढील महिन्यात नवीन सदस्य निवडले जाणार आहे. लाभाचे पद असणाºया या समितीवर वर्णी लागावी, यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्टÑवादी आणि अपक्ष नगरसेवकांची चूरस लागली आहे. इच्छुकांनी नेत्यांचे उंबरे झिजविण्यास सुरूवात केली आहे. भोसरी विधानसभेला सभापतीपदासाठी संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक व अपक्ष एक असे सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर बाहेर पडतात. ही नावे चिठ्ठी काढून निश्चित केले जातात. बुधवारच्या स्थायी सभेत सदस्यांचा ‘ड्रॉ’ काढण्यात आला. पहिल्याच चिठ्ठीत अध्यक्षा सीमा सावळे यांचे नाव निघाले. त्यापाठोपाठ कुंदन गायकवाड, उषा मुंडे, हर्षल ढोरे, आशा शेंडगे, कोमल मेवाणी या भाजपाच्या सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर यांच्या नावाच्या चिठ्ठया निघाल्या. त्याच्या जागी अन्य सदस्यांनी वर्णी लागवी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
राष्टÑवादीकडून दोन जणांची नावे दिली जाणार आहेत. लकी ड्रॉ मुळे राष्टÑवादीचे मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ आणि शिवसेनेचे अमित गावडे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे लकी ठरले आहेत.
भोसरी मतदारसंघातील आमदारांचे निकटवर्तीय असणाºया महिलेला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यापदासाठी भाजपाचे नगरसेवक शितल शिंदे, विलास मडेगिरी, शत्रुघ्न काटे, राहूल जाधव, प्रा. सोनाली गव्हाणे, निर्मला गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे.

पन्नास जणांना संधी
महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर सर्वांना स्थायी समितीवर काम करण्याची संधी देण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे लकी ड्रॉ पूर्वी भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थायीतील दहा सदस्यांचे राजीनामे घेतले होते. मात्र, या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे मंत्री काय निर्णय घेतात याकडे भाजपाच्या नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे लकी ड्रॉमध्ये भाग्यवान ठरलेल्या भाजपाचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे यांना आपले काय होणार याची चिंता आहे.

- स्थायी समितीवर सदस्यपदी भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांमध्ये चूरस लागली असली तरी सभापती कोण होणार आणि पिंपरी, चिंचवड कि भोसरीला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. सध्याच्या सभापती या भोसरी विधानसभेतील होत्या. तसेच महापौर नितीन काळजे आणि पक्षनेते एकनाथ पवार हेही भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच आहेत.

Web Title: Chorus to be recruited for standing committee; Councilors from Bhosari constituency will get discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.