स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस

By admin | Published: March 18, 2017 04:47 AM2017-03-18T04:47:30+5:302017-03-18T04:47:30+5:30

महापौर, उपमहापौर, पक्षनेता निवडीनंतर आता स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. स्थायी समिती सभापती चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभेतील कोणाची

Churus for the post of Standing Committee | स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस

Next

पिंपरी : महापौर, उपमहापौर, पक्षनेता निवडीनंतर आता स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. स्थायी समिती सभापती चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभेतील कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिंचवड विधानसभेलाच स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार असल्याचा दावा भाजपाचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी शत्रुघ्न काटे, माई ढोरे, आशा शेंडगे व माधवी राजापूरे यांची नावे चर्चेत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. महापालिकेत भाजपाची प्रथमच सत्ता आली आहे. मात्र, पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि जुन्या नव्यांच्या वादामुळे स्थायी समितीसह इतर समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांची निवड रखडली आहे. महापालिकेची निवडणूक शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढली. आता निवडणुकीनंतर भाजपात खासदार अमर साबळे, आमदार जगताप, आमदार महेश लांडगे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, माजी महापौर आझम पानसरे असे गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीत भाजपातील अंतर्गत गटबाजी उफाळून होती. ऐन निवडणुकीत नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना संधी देण्यात आली.
महापौर व उपमहापौर निवडीत चिंचवडमधील भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांना डावलल्याने पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष व सदस्य निवडीत चिंचवडला झुकते माफ देण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)

पक्षनेते आणि महापौरांत सवतासुभा
भाजपातील जुन्या गटांचे प्रतिनिधी म्हणून पक्षनेते एकनाथ पवार, नवीन गटांचे प्रतिनिधी म्हणून नितीन काळजे यांना संधी दिली. महापौरांनी पहिली बैठक स्वत:च्या अधिकारात घेतली. यापूर्वीचे महापौर पक्षनेते आणि पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांच्यात बैठक होत होती. पक्षनेत्यांनी पदभार स्वीकारताच शासकीय वाहन नाकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापौर, उपमहापौर व अन्य पदाधिकाऱ्यांची अडचण झाली आहे. वरवर पवार आणि काळजे यांच्यात गटबाजी दिसून आली.

स्थायी समितीवर संधी देताना पिंपरी, चिंचवड किंवा भोसरी विधानसभा असे न पाहता शहर पातळीवरील विचार करून संधी दिली जाणार आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात झुकते किंवा कोणावर अन्याय करण्याचा उद्देश नाही. स्थायी समिती सभापतीनिवडीनंतरच्या सभेत विषय समित्यांची निवड करण्यात येणार आहे.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

Web Title: Churus for the post of Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.